आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेला 8 कोटींचे उत्पन्न देणा-या प्रकल्पाचे भूमिपूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उभारणी आधीच 8 कोटींचे उत्पन्न देणा-या पालिकेच्या पहिल्याच प्रकल्पाचे भूमिपूजन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बुधवारी (2 जुलै) झाले. या प्रकल्पात टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर क्रीडा संकुल व 52 गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी 4 कोटी रुपये खर्च येतोय आणि पालिकेकडे त्या बदल्यात 12 कोटी रुपये जमा होताहेत, असे चित्र पहिल्यांदाच दिसले.
या वेळी महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे, सभागृहनेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आतापर्यंतच्या बी.ओ.टी. प्रकल्पाचे चित्र :
प्रत्येक प्रकल्पात पालिकेचे आर्थिक नुकसान. स्वत:चा वाटा भरून काढण्यासाठी कर्ज काढले, कर्ज फेडणे अवघड, कारण भाडेही आले नाही. पालिके ची जमीनही गेली. या प्रकल्पात मात्र जमीन पालिकेच्याच ताब्यात. प्रकल्पाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच जमा झाली रक्कम. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला देणार 4 कोटी. सध्या पालिकेच्या तिजोरीत 12 कोटी रुपये जमा.
असे होईल बांधकाम
3000 आसन क्षमतेचे आरसीसी स्टेडियम. त्याखाली 10 बाय 15 आकाराची 52 दुकाने, दुकानांसमोर 7 फुटांचा व्हरंडा, खेळाडूंसाठी डॉरमेटरी हॉल, स्वच्छतागृहे, जिना, दोन मुख्य प्रवेशद्वार, त्यासमोर पेव्हर ब्लॉक, स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी बसण्यासाठी मोठे ओटे, बॉस्केट बॉल, व्हॉलीबॉल कोर्ट.

गाळ्यांसाठी आरक्षणही टाकले
वाटप करण्यात आलेल्या गाळ्यांपैकी एका गाळ्यासाठी 45 लाख रुपये मोजावे लागले. मात्र, जो जास्त पैसे देईल, त्याला गाळा देण्यात आला नाही. त्यासाठी आरक्षणही निश्चित करण्यात आले होते. असे होते आरक्षण. खुला वर्ग-31 गाळे, मागासवर्ग- 3, अपंग-1 आणि महिला- 15

फायदा होणार
- पालिकेला आर्थिक उत्पन्न तसेच फायदा करून देणारा इतिहासातील हा पहिलाच प्रकल्प आहे. येथे कर्ज काढणे नाही की जमिनीचा ताबा इतरांना देणे नाही. 12 कोटी जमा होतात 4 कोटी खर्च होतो, असे मी पहिल्यांदाच पाहतोय. बीओटीचे अन्य प्रकल्पही याच धर्तीवर घेतले जावेत.
संजय जोशी, उपमहापौर.

बीओटी प्रकल्प असेच राबववा
बीओटीचे प्रकल्पांचा याच पद्धतीने विकास व्हावा, त्यामुळे पालिकेचा तसेच नागरिकांचाही फायदा होईल. पालिकेने स्वत:च्या फायद्याचा विचार करावा. कायद्याचे पालन केले की सर्व गोष्टी सहज शक्य होतात. प्रदीप जैस्वाल, आमदार