आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवशिक्या कारचालकाने दोन दुचाकींना उडवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नवशिक्याच्या भरधाव कारने दोन दुचाकींना उडवल्याने बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक महिला आणि एक युवक जखमी झाले आहेत. ह्युंदाई कंपनीची आय टेन ही विनापासिंग कार चालवणार्‍या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ऊर्मिला सुनील मोटे (39, रा. दलालवाडी) या त्यांच्या प्लेझरवरून गोपाल टीसमोरून जात होत्या. त्याच वेळी जिजा रुस्तुम कोळगे (39, रा. बिडकीन) हे सीडी डॉन या दुचाकीवरून जात होते. त्या वेळी मागून आलेली कार या दोन्ही दुचाकीला धडकली. यात मोटे आणि कोळगे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवशिक्या संजय विठ्ठलराव लोणे (रा. क्रांती चौक पोलिस ठाण्याजवळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.