आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेतानाचा सेल्फी नवऱ्याला पाठवून पत्नीची आत्महत्या, वेळ देत नसल्याची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील पडेगाव परिसरातील रामगोपालनगर भागात एका नवविवाहितेने गळ्यात फास अडकवून काढलेला सेल्फी पतीला पाठवून आत्महत्या केली. नवविवाहितेने असे का केले असेल, याची परिसरात शुक्रवारी चर्चा होती.

26 वर्षीय प्रवलिका तेरम मनोहर या महिलेने शुक्रवारी सकाळी तामिळ भाषेत सुसाइड नोट लिहून ठेवली. त्यात तिने पती पूर्वीसारखे प्रेम करीत नाही, अशी तक्रार केली आहे. लग्नापूर्वी भरपूर वेळ देत होता, आता तसा टाइम स्पेंड करीत नाही, पतीचे प्रेम कमी झाले असल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पडेगावमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी छावणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

एक महिन्यापूर्वी झाले होते लग्न
- सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता सुसाइड नोट लिहिली.
- दुपारी पावणेबारा ते बारा वाजता दरम्यान आई-वडील आणि पतीला फोन करुन आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर गळ्यात फास टाकलेला सेल्फी पतीच्या मोबाइलवर पाठविला.
- प्रवलिका आणि तेरम मनोहर यांचा महिनाभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. तेरम मनोहर औरंगाबादेतील अदालत रोडवरील आयसीआयसीआय बँकेत उपमहाव्यवस्थापक आहेत.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या, काय घडले होते दोघांमध्ये आदल्या रात्री - प्रवलिकाची सोसाइड नोट आणि गळफास घेतलेला सेल्फी...
बातम्या आणखी आहेत...