आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीत प्रथमच अवतरणार नऊ अजरामर ‘नाट्यकर्मी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रंगकर्मींच्या जीवनाचा वेध घेणारा ‘रंगकर्मी’ हा चित्रपट 27 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. यात डॉ. अमोल कोल्हे मोरूची मावशी, बॅरिस्टर, शंभूराजे, वाहतो ही दुर्वांची जुडी, कर्ण, चाणक्य, नटसम्राट, शिवाजी आदी नऊ भूमिका साकारणार आहेत. मराठी सिनेसृष्टीत एकच कलाकार नऊ अजरामर भूमिका साकारण्याचा हा पहिल्याच प्रयोग आहे, असा दावा चित्रपटाच्या चमूने आज पत्रकार परिषदेत केला.
डॉ. कोल्हे म्हणाले, गेल्या 110 वर्षांपासून नाट्यभूमी अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नाटकावरील अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले आहेत, मात्र नाट्यकलावंतांचे आयुष्य दाखवणारा हा चित्रपट आहे. नाट्यकलावतांची जडणघडण आणि निष्ठा यांचा प्रवास चित्रपटातून उलगडला जाणार आहे. केशव मल्हारराव इनामदार या गावातून आलेल्या नाट्यवेड्या मुलाची भूमिका चित्रपटात साकारत असल्याचे त्यांनी सांगितले.
शीतल दाभोळकर म्हणाली, या चित्रपटातील माझी भूमिका एका घटस्फ ोटीत स्त्रीची आहे. गावाकडून आलेल्या केशवला नाटकांसाठी लागणारी विविध प्रशिक्षणे देऊन ही स्त्री त्याला तयार करते. त्याच्या प्रेमात पडते, पण ते कधीच बोलून दाखवत नाही. दिग्दर्शक संजय कोलते म्हणाले, मी गेल्या 34 वर्षांपासून रंगभूमीवर वावरतो आहे. त्यामुळे रंगभूमीची नशा, निष्ठा, कलावंताचा प्रवास आणि त्याचे अंतरंग या चौफेर विषयांवर भाष्य करणार्‍या या चित्रपटाची जुळवणूक केली. प्रेक्षकांना नाट्यसृष्टीचे सखोल दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे.