आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळवीरांना उपयुक्त विद्युत संयुगाचा शोध, पेटंटही मिळाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अंतराळात ऊर्जा टिकवून ठेवणाऱ्या संयुगाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधकांनी शोध लावला. यात माजी विभागप्रमुख डॉ. जी. के बिचिले, प्रा. डॉ. के. एम. जाधव संशोधक विद्यार्थी प्रा. प्रणव बर्दापूरकर डॉ. सुहास देसाई यांचा समावेश आहे. "पीएसबीटी' नामक या संयुगाच्या संशोधनाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली असून तब्बल सहा वर्षांनी विद्यापीठाला पेटंट मिळाले आहे.
काय आहे संशोधन

पीएसबीटी अर्थात लेड बेरियम स्ट्रॉशियम टिटानेट हे फेरोइलेक्ट्रिक बनवण्याचे निर्मिती तंत्रज्ञानाचे पेटंट भारत सरकारकडे मान्यतेसाठी २०१० मध्ये विद्यापीठाने पाठवले होते. पेटंटचा दावा सरकारने डिसेंबर २०१५ मध्ये मंजूर केला. या संयुगाचा उपयोग विविध इलेक्ट्राॅनिक उपकरणांत करता येणे शक्य आहे. यान अवकाशात गेल्यावर अत्यंत वेगाने माहितीचा संग्रह करावा लागतो. त्यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे संवहन करणारी ऊर्जा लागते. त्यासाठी हे संशोधन एक मैलाचा दगड ठरणार आहे. या संशोधनाने पीएसबीटी संयुगापासून तयार केलेल्या मायक्रोचिप्समध्ये मोठी माहिती साठवून ठेवता येते. तसेच उच्च वारंवारता (हायफ्रिक्वेन्सी)चे कॅपॅसिटर तयार करता येते. मोठमोठे अवकाश यान, सायन्स लॅब किंवा जेथे मोठ्या ऊर्जेची गरज असेल तेथे हे संशोधन कामी येऊ शकते. डॉ. बिचिले यांच्या ज्ञानाचा उपयोग : डॉ.बिचिले हे विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमचे लीडर तसेच माजी विभागप्रमुख आहेत. त्यांनी केलेल्या अथक संशोधनाचे फलित म्हणजे हे पेटंट आहे. विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाला मिळालेले हे पहिलेच पेटंट आहे. डॉ. बिचिले यांनी अतिशीघ्रवाहकता (सुपर कंडक्टिव्हिटी), फास्ट आयन कंडक्टर, विविध चुंबकीय पदार्थ,फेरोइलेक्ट्रिक आदी विषयांवर उच्च दर्जाचे संशोधन केले असून त्यांचे तब्बल २०० शोधनिबंध जगभरातील मान्यताप्राप्त िनयतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.

आता विद्युत प्रवाह खंडित होणार नाही
भारतात वारंवार विद्युत प्रवाह खंडित होण्याची मोठी समस्या आहे. या संशोधनाने ही समस्या कायमची दूर होईल, असा दावा या संशोधकांनी केला आहे. डायनामिक रँडम असेस मेमरी स्टॅस्टिक रँडम असेस मेमरी पेक्षाही पीबीएसटी संयुगामुळे अखंडित अक्षय ऊर्जा मिळू शकते, असा दावा करण्यात आला.
पुढीस स्लाइड्सवर जाणून घ्या, काय म्हणतात संशोधक...