आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक मंचाने दोन महिन्यांत निर्णय घेणे बंधनकारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्राहकमंचात गेल्यानंतर दोन महिन्यांत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच नवीन विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
हॉटेल विंडसर कॅसलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांताकुमारन यांच्या अध्यतेखाली समिती नेमली असून ग्राहक हिताचे निर्णय घेण्याबाबत अभ्यास सुरू आहे. साखरेचे आयात शुल्क दहा टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेले. ऊसदराबाबत शरद पवार, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, राजू शेट्टी, अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे ते म्हणाले. या वेळी आमदार नारायण कुचे, उपमहापौर संजय जोशी, बापू घडामोडे, शिरीष बोराळकर, दिलीप थोरात उपस्थित होते.

देशात अतिरिक्त साखर : देशालावर्षाकाठी २३० लाख मेट्रिक टन साखर लागते. गेल्यावर्षीची ७० लाख मेट्रिक टन आणि यावर्षी २५० लाख मेट्रिक टन उत्पादन होईल. त्यामुळे ३२० लाख मेट्रिक टन साखर उपलब्ध असणार आहे. यामध्ये ९० लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखर देशात असणार आहे.