आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाची अाता ‘खेळाडू दत्तक’ याेजना, युवा खेळाडूंसाठी नवा प्रयाेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - अागामी काळात पदक विजेत्या खेळाडूंची संख्या वाढवण्यासाठी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘खेळाडू दत्तक’ याेजना राबवण्याचा निर्णय घेतला अाहे. हा निवासी प्रशिक्षणाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने पुढाकार घेतला अाहे. त्यामुळे या याेजनेला लवकरच सुरुवात हाेण्याची शक्यता अाहे. या याेजनेच्या माध्यमातून स्टार युवा खेळाडू वर्षभरात घडतील, असा विश्वासही व्यक्त केला जात अाहे.
अाॅगस्टपासून सुरुवात
विद्यापीठाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या निवासी प्रशिक्षणाच्या याेजनेला अागामी अाॅगस्टमध्ये सुरुवात हाेण्याचे शक्यता अाहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात अाला अाहे. कुलगुरू डाॅ. चाेपडे यांच्या मान्यतेनंतर या याेजनेला हिरवी झेंडी मिळणार अाहे. त्यामुळे येत्या दाेन महिन्यांमध्ये या याेजनेला सुरुवात हाेईल, अशी सूत्रांनी माहिती दिली. प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळणार अाहे. त्यामुळे ही याेजना अाता अंतिम टप्प्यामध्ये असल्याचीही चर्चा अाहे.

कुलगुरूंची संकल्पना
विद्यापीठामधील खेळाडूंच्या प्रतिभेला याेग्य प्रकारे चालना मिळावी अाणि अागामी काळात राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडू तयार व्हावे, यासाठी एखादा अभिनव उपक्रम राबवण्यात यावा, अशी कुलगुरू डाॅ. चाेपडे यांची संकल्पना हाेती. या वेळी या संकल्पनेला क्रीडा विभागाचे प्रमुख डाॅ. उदय डाेंगरे यांनी चालना दिली. त्यामुळे खेळाडूंसाठी अाता विद्यापीठामध्येच निवासी प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेेण्यात अाला. हा उपक्रम खेळाडूंसाठी फायदेशीर ठरेल.

राज्यातील पहिला प्रयाेग
खेळाडूंच्या कला-काैशल्याला चालना देण्यासाठी अाणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून युवा खेळाडूंच्या प्रतिभेला पैलू पाडण्यासाठी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठ दत्तक याेजना राबवणार अाहे. युवा खेळाडूंसाठीचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयाेग अाहे. याच्या माध्यमातून युवा खेळाडूंना चांगल्या प्रकारे फायदा हाेण्याची शक्यता अाहे.
अभिनव उपक्रम असा
अॅथलेटिक, व्हाॅलीबाॅल तलवारबाजी व फुटबाॅलच्या प्रत्येकी ७/८ खेळाडूंची निवड.
पदवीच्या प्रथम वर्षातील युवा खेळाडू पात्र.
चाचणीच्या माध्यमातून प्रतिभावंतांना संधी.
क्रीडा विभागातील पाच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण.
निवास, भाेजन अाणि प्रशिक्षणाचा खर्च विद्यापीठ करणार.
^ या याेजनेच्या माध्यमातून वर्षभरात स्टार खेळाडू घडतील. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून निश्चितपणे खेळाडूंना फायदा हाेईल. अागामी काळात राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू उपक्रमामधून घडतील.
-डाॅ. उदय डाेंगरे, विभागप्रमुख, क्रीडा विभाग
बातम्या आणखी आहेत...