आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर विक्रेता ते विधानसभाध्यक्षपद; दत्ताजी भाले-वसंतराव भागवतांनी घडवले या नेत्याला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : हरिभाऊ बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस

औरंगाबाद -
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून दहा वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री हरिभाऊ बागडे पाचव्यांदा विजयी झाले आणि आता राज्यात भाजपच्या नेतृत्वातील पहिल्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षाचे मानाचे पद त्यांना बिनविरोध मिळाले आहे. त्यांच्या विरोधातील शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.
बागडेंनी 1985 ते 2004 या काळात फुलंब्रीचे प्रतिनिधित्व केले व चारही वेळा मतविभाजनामुळेच त्यांचा विजय झाला. बागडेंच्या पाचव्यांदा झालेल्या विजयात कॉग्रेसच्या मतांचे विभाजन कारणीभूत ठरले आहे. विजयी बागडेंना 73294 मते मिळाली तर कॉग्रेसचे पराभूत उमेदवार माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना 69683 मते मिळाली. बागडेंनी 3611 इतक्या निसटत्या फरकाने विजय खेचून आणला.

महाराष्ट्रात अध्यक्षाची निवड एकमताने करण्याची परंपरा राहिली आहे.
राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीन उमेदवार उभे होते. मात्र सेना आणि काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने बागडेंची बिनविरोध निवड झाली आहे.
34 वर्षानंतर मराठवाड्याला प्रथमच अध्यक्षपद
बागडेंच्या निमीत्ताने मराठावड्याला अध्यक्षपदाचा दुसर्‍यांदा मान मिळाला आहे. याआधी 1978 ते 80 या काळात शिवराज पाटील अध्यक्ष होते. 34 वर्षानंतर पुन्हा एकदा हा मान मराठवाड्याला मिळाला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, वृत्तपत्र विक्रीपासून सुुरुवात आता बँक-साखर कारखान्याचे संचालक