आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृक्श्राव्याच्या माध्यमातून विद्यार्थी शिकणार हिंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भाषा विभागांमधील तोकडी विद्यार्थीसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विभागांकडे आकर्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून हिंदी भाषा विभागात यावर्षीपासून दृक्श्राव्य माध्यमातून शिकवले जाणार आहे. या उपक्रमात केंद्रीय हिंदी निदेशनालयाची मदत घेतली जाईल.

विद्यापीठातंर्गत 42 विभाग कार्यरत आहेत. यात सर्वात जुने आणि उत्तमोत्तम साहित्यिक घडवणारे भाषा विभागही आहेत. परंतु वाढत्या स्पर्धेत करिअरच्या संधी पाहून विषय निवडणारी विद्यार्थी मंडळी आता या विभागांत प्रवेश घेण्यासाठी फारशी उत्सुक दिसत नाही. त्यामुळे भाषा विभाग बंद होतात की काय? असे वातावरण निर्माण झाले होते.

वास्तविक पाहता भाषा क्षेत्रातही चांगल्या संधी असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले जाणार आहे. यासाठी हिंदी विभागाने पुढाकार घेतला. 70 विद्यार्थी क्षमता असणा-या या विभागात यंदा केवळ 30 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अशाही परिस्थितीत आहेत त्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी मिळवून देण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. केंद्रीय हिंदी निदेशनालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या 40 सीडी विभागात आणल्या जातील, अशी माहिती विभागाचे प्रमुख डॉ. माधव सोनटक्के यांनी दिली.