आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळासमोर नवीन "सुभेदारी' वसणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्याएक शतकापासूनच्या राजकीय खलबतांचे साक्षीदार असलेल्या सुभेदारी विश्रामगृहातील वर्दळ लवकरच कमी होण्याचे संकेत आहेत. मंत्री, नेत्यांची ये-जा, त्यासाठी लावावा लागणारा पोलिस बंदोबस्त यात ही इमारत परिसर अपुरा ठरतो. त्यामुळे विमानतळाजवळ प्रशस्त जागेत विश्रामगृहासाठी नवी इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.
१९ व्या शतकाच्या प्रारंभी निझामाने ही वास्तू उभारली होती. किमान शंभर वर्षे वयोमान असलेल्या मुख्य इमारतीची शान अजूनही कायम आहे. वेळोवेळी तिची देखभाल-दुरुस्ती केल्याने ही इमारत एक शतकापेक्षाही जास्त वयाची असेल, असे वाटत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्व राजकीय नेते, मंत्री शहरात आल्यानंतर याच इमारतीत थांबत. अलीकडे मंत्र्यांना मोठा बंदोबस्त द्यावा लागतो. पोलिसांना बंदोबस्त देताना येथे जागा अपुरी पडते. त्याचबरोबर मंत्र्यांना विमानतळावरून या विश्रामगृहावर येण्यासाठी १५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हे टाळण्यासाठी विश्रामगृह विमानतळाजवळच असावे, अशी प्रशासकीय तसेच पोलिस अधिकाऱ्यांची अनेक वर्षांची सूचना आहे.

कशासाठी नवे विश्रामगृह?
विमानानेये-जा करणारे मंत्री, नेत्यांना शहरात येण्याची गरजच पडू नये. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला या मंडळींना सामोरे जावे लागणार नाही. पार्किंग तसेच अन्य सोयीही नव्या ठिकाणी करता येतील.

नंतर झाल्या दोन इमारती
मूळसुभेदारी विश्रामगृह अपुरे पडू लागल्याने गरजेनुसार बाजूला दोन इमारती उभारण्यात आल्या. अजिंठा आणि वेरूळ अशी नावे त्यांनी देण्यात आली. सध्या या इमारतींच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

मेहमानखाना, सर्किट हाऊस ते सुभेदारी
निझामाच्याकाळात या इमारतीचे नाव मेहमानखाना असे होते. निझामाचे पाहुणे येथे थांबत. काही सुभेदारही येथे थांबत असल्याने सुभेदारी असाही या इमारतीचा उल्लेख केला जात होता. शासकीय भाषेत सर्किट हाऊस असे संबोधले जात होते. परंतु आता याचा उल्लेख पूर्णत: सुभेदारी विश्रामगृह असा केला जातो.