आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय दशेतच राजकारणाचे धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शालेय विद्यार्थी पात्र नसतील तरी त्यांना राजकारणाचे महत्त्व कळावे, म्हणून आता नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकशास्त्र विषय बदलून त्याठिकाणी इतिहासाला राजशास्त्र या विषयाची जोड देण्यात आली आहे. हा बदल पाहता विद्यार्थी आता शालेय जीवनापासूनच निवडणुकीचे धडे गिरवणार आहेत.
सार्वजनिक जीवनात राजकारणाला नेहमी वाईट संबोधले जाते; पण याची समाजात काय गरज आहे, भारतीय संसदीय कार्यप्रणाली कशी आहे, मतदान प्रक्रिया कशी राबवली जाते, प्रशासनाची देशाच्या विकासात, जडणघडणीत काय भूमिका आहे याचे महत्त्व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहितीसह विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.
आतापर्यंत केवळ महाविद्यालयीन स्तरावरच राज्यशास्त्र विषय शिकवला जात होता. त्यामुळे एकदम हा विषय शिकताना विद्यार्थ्यांना हा विषय काही प्रमाणात अवघड वाटत असे. मात्र, आता नववीपासूनच राजकारणाचे धडे गिरवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल. या विषयात प्रामुख्याने राज्यशास्त्र म्हणजे काय? त्याचे महत्त्व, गरज, मानवाचे अधिकार व कर्तव्ये, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) यांचा अभ्यास करता येणार आहे.
विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर होतील - राजकारण म्हणजे वाईट, केवळ भ्रष्टाचार हे समीकरणच मुलांसमोर आहे. मात्र, राजकारणाची समाजासाठी गरज त्याचे महत्त्व, लोकशाही मूल्ये जपण्याची आवश्यकता याची माहिती होणे ही गरजेचे आहे. आपण मतदान हक्क का बजावायचा हे विद्यार्थ्यांना कळण्यास मदत होईल. या विषयासंबंधी असलेले गैरसमजही दूर होतील. शालेय जीवनातच राजकारण समजले तर भविष्यात याचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. आशा माल्टे, शिक्षिका पायेनिअर्स सेकंडरी स्कूल