आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Train From Aurangabad To Tirupati Each Friday

आनंदाची बातमी: तिरुपतीसाठी नवी रेल्वेगाडी, औरंगाबादेतून धावणार दर शुक्रवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद-रेनिगुंटा रेल्वेला शनिवारी, १३ रोजी औरंगाबादेत हिरवी झेंडी दाखवण्यात येईल. नंतर दर शुक्रवारी ही गाडी निघेल. नव्या गाडीत एक एसी, प्रत्येकी सहा स्लीपर व द्वितीय श्रेणीचे डबे राहतील. ही गाडी परभणी, लातूर रोड, बिदर, विकाराबाद, मंत्रालयम, कडप्पामार्गे जाईल. रेनिगुंटापासून तिरुपती ९ किमीवर आहे. नगरसोल-चेन्नई दर सोमवारी दुपारी २.३५, तर दर बुधवारी सकाळी ७.२० वाजता ओखा-रामेश्वरम या गाड्या येथून आधीपासून आहेत.

दुपारी ४ वाजता निघणार
औरंगाबादेतून दर शुक्रवारी दुपारी ४ वाजता ही गाडी निघेल. शनिवारी सायं. ७ वाजता रेनिगुंटाला पोहोचेल. दर शनिवारी रात्री १०.०५ वाजता रेनिगुंटा येथून निघेल.