आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा कचरा डेपो मिटमिट्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -कच-यामुळे जीणे हैराण झालेल्या नारेगाववासीयांना आता मोकळा श्वास घेता येईल. मनपाने मिटमिट्याजवळ डोंगराच्या पायथ्याशी 50 एकर जागेवर कचरा डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तीन महिन्यांत तो कार्यान्वित होणार आहे.


नारेगाव येथील कचरा डेपो हटवावा, अशी मागणी होत होती. यासंदर्भात नुकतेच आंदोलनही झाले. मनपाला कचरा डेपोसाठी योग्य जागेचा शोध होता. अखेर शहरापासून पाच किमी अंतरावरील मिटमिट्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय जमिनीचा पर्याय समोर आला. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार व विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून जागेसाठी प्रयत्न केले आणि दोघांनी मान्यता दिली. यासंदर्भात मनपाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी निर्णय घ्यायचा असल्याने सोमवारी आयुक्त डॉ. कांबळे यांनी महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती सभापती नारायण कुचे, सभागृह नेते सुशील खेडकर, विरोधी पक्षनेत्या आशा मोरे, यूपीएचे गटनेते मीर हिदायत अली, आरोग्य सभापती मनीष दहीहंडे आदींना ही जागा दाखवली. त्या सर्वांनी या जागेला पसंती दाखवल्याने डेपो येथे सुरू होईल. डॉ. कांबळे म्हणाले, कचरा डेपो सुरू झाल्यावर लवकरच तेथे प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल.


त्यासाठी पुण्यातील प्रकल्पाची पाहणी केली असून तसाच प्रकल्प येथे असेल. या माध्यमातून येणा-या कच-यापैकी 90 टक्के कच-यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती व भट्ट्यांना लागणारी पिलेट्स तयार केली जातील. तो प्रकल्पही 100 दिवसांत सुरू केला जाईल.
त्यासाठी पुण्यातील प्रकल्पाची पाहणी केली असून तसाच प्रकल्प येथे असेल. या माध्यमातून येणा-या कच-यापैकी 90 टक्के कच-यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती व भट्ट्यांना लागणारी पिलेट्स तयार केली जातील. तो प्रकल्पही 100 दिवसांत सुरू केला जाईल.

नारेगावचा प्रश्न सुटला
महापौर ओझा म्हणाल्या, कचरा डेपो हलवल्याने नारेगावचा प्रश्न सुटणार आहे. हा भाग नागरी वस्त्यांपासून दूर असल्याने येथे नारेगावसारखा प्रश्न निर्माण होणार नाही. नारेगावात मनीष दहीहंडे आणि इतरांनी केलेल्या आंदोलनानंतर कचरा डेपो हटवण्याचा निर्णय डिसेंबरपर्यंत घेऊ, असे सांगितले होते. तो शब्द आम्ही पाळला.
13 खात्यांच्या परवानग्या :
गट नं. 307 मधील ही 50 एकर जागा जरी राज्य शासनाच्या मालकीची असली तरी मनपाच्या हद्दीत येते. त्यामुळे तेथे कचरा डेपो उभारणे मनपाला फारसे जिकिरीचे जाणार नाही. मात्र, हे काम आधी प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि सरकारच्या इतर 13 खात्यांकडून ना हरकत प्रमाणपत्रे घ्यावी लागणार आहेत. यातील बहुतेकांशी अनौपचारिक बोलणे झाले असल्याने त्यास अडचण येणार नाही, असे आयुक्त म्हणाले. ही जमीन घेण्यासाठी साधारणपणे 3 कोटी रुपये लागणार असून हे पैसे लगेच दिले जातील, असेही ते म्हणाले.

मनपाला काय करावे लागेल?
० सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन जमिनीचा व्यवहार पूर्ण करावा लागणार
० 50 एकर जलागणार मुख्यरस्त्यापासून आतमध्ये दोन किमी अंतरावर असल्याने तेथे जाण्यासाठी रस्ता तयार करावा लागेल
० काही घरांचे भूसंपादन करून जागा मिनीसाठी सरकारला तीन कोटी रुपये द्यावे लागणार
० जागा मिटमिट्यात ताब्यात घेतल्यावरच कच-याचे ट्रक जाऊ शकतील एवढा मोठा रस्ता तयार करावा लागणार आहे
० भूसंपादन आणि रस्त्यासाठी सभागृहाची मान्यता घ्यावी