आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या तोंडावर एक कोटी रुपयांची नळ जोडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाणीपुरवठा विभागाकडे वर्षभरापासून एक कोटी ४३ लाख रुपये पडून असल्याचे वृत्त "दिव्य मराठी'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुवर्ण दलित वस्ती योजनेतील निधीतून खासगी नळ जोडणी आणि शौचालय बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी मंगळवारी गटविकास अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

शासनाकडून पाणीपुरवठा विभागाला सुवर्ण दलित वस्ती योजनेतून आलेल्या चार कोटी निधीतून दोन कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित एक कोटी ४३ लाख रुपयांचे गेल्या वर्षीपासून कोणतेच नियोजन केले नाही. त्यामुळे हा निधी तसाच पडून होता. हा निधी पाणीपुरवठा विभागाचा असला, तरी दलित वस्ती सुधार योजनेतील असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून त्याचा पाठपुरावाही करण्यात आला. परिणामी, हा निधी मार्गी लावून लाभार्थींना त्याचा लाभ होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने पावले उचलली आहेत. या निधीचे नियोजन करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक १८ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. मार्चपूर्वी हा निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

शक्य असल्यास नियोजन करून खर्च
हा निधी समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेतून खर्च करावयाचा असल्यास त्याचे नियोजन करून खर्च करू शकतो. शीला चव्हाण, समाजकल्याण सभापती

मंगळवारच्या बैठकीत निर्णय घेऊ
या निधीचे नियोजन करण्यासाठी बीडीओंची मंगळवारी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत हा निर्णय होणार असून निधी खर्च करण्यात येईल. गजानन रबडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग