औरंगाबाद - अपंग, रुग्ण आणि स्वत:च्या पायावर उभा न राहता येणा-या ज्येष्ठांसाठी बॅटरीवर चालणारी स्वयंचलित व्हीलचेअर पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. 64 हजार रुपयांत तयार झालेली व्हीलचेअर सुरक्षितपणे स्वत:हून पाय-या उतरते. रात्रभर बॅटरी चार्ज केल्यास 14 किलोमीटरचा प्रवास करणेही शक्य होईल. दीड लाखाच्या पॉवर व्हीलचेअरच्या तुलनेत ही खूप स्वस्त व्हीलचेअर उपलब्ध करून देता येईल, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटत आहे.
उद्योजकांची मदत
प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राची मदत मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील श्री टेक्नो सोल्युशनचे ए. एन. मुळे आणि एन. एस. तोष्णीवाल यांनी मदत केली. अपूर्वा एंटरप्रायजेसचे एमडी यू. एस. प्रयाग यांनी आपले वर्कशॉप वापरण्यासाठी दिले. मेकॅनिकल विषयातील तज्ज्ञ निखिल मानकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
अत्याधुनिक प्रणालीसाठी प्रयत्न -
चाकांना सेन्सर बसवल्यास अडथळ्यांची पूर्वसूचना प्राप्त होऊन स्वयंचलित चेअर डेंजर झोनपासून स्वत:च सावध होऊ शकेल. अशा - सागर दळवी, प्रोजेक्ट लीडर
सामाजिक बांधिलकीसाठी संशोधन
- वृद्ध व रुग्णांना मदतीशिवाय ट्रॅव्हल करता येईल, त्यांच्यातील न्यूनगंड कमी व्हावा म्हणून हे संशोधन करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा होती. गरीब व्यक्तीही खरेदी करू शकेल.
एस. एस. खेडगीकर, विभागप्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स