आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्ष जल्लोष रंगणार पहाटे पाचपर्यंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नववर्ष आणि 31 डिसेंबरनिमित्त हॉटेल व रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. हॉटेल असोसिएशनच्या वतीने परवानगी मागण्यात आली होती. ती देताना ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी प्रदूषण नियामक मंडळाच्या व न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यास बजावण्यात आले आहे.

नाशिकमध्ये 31 डिसेंबरला सशुल्क पार्टी आयोजित करण्यासाठी करमणूक विभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यानुसार नाशिकमध्ये 7 हॉटेल्स, मॉटेल्स आणि रेस्टॉरंटने जिल्हा करमणूक कर विभागाकडे अर्ज करत परवानगी मागितली आहे. परवानगी न घेता पार्टीचे आयोजन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

वन डे पार्टी परमिट
ख्रिसमस आणि 31 डिसेंबरची रात्र उत्साहात साजरा करू इच्छिणार्‍यांना उत्पादन शुल्क विभागाकडून वन डे पार्टी परमिट सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. मद्यप्रेमींसाठी परवाना सक्तीचा असून त्याशिवाय मद्य पिणार्‍यांवर विभागाची नजर राहणार आहे. यासाठी विभागाने विशेष दहा पथके नियुक्त केली आहेत.