आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज - वाळूजपासून 15 किलोमीटरवरील सुलतानपूर येथे 12 दिवसांची नवजात बालिका बुधवारी (4 सप्टेंबर) भरदुपारी तीनच्या सुमारास बेपत्ता झाली. या बालिकेला कोणी चोरून नेले की एखाद्या प्राण्याने उचलून नेले, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या घटनेची वाळूज पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. लवकरच या प्रकाराचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक संदिपान गवळी यांनी व्यक्त केला आहे.
सुलतानपूर हे 660 लोकसंख्येचे गाव आहे. गावात प्रारंभीच बाळचंद्र म्हसू पाटील इथापे हे सहकुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांची रस्त्याच्या बाजूला दोन घरे आहेत. त्यांच्याकडे सोनाली पांडुरंग काकडे (25) ही मावसबहीण बाळंतपणासाठी मागील क ाही दिवसांपूर्वी आली होती. 24 ऑगस्ट रोजी सोनालीने घरीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ आणि बाळंतिणीला दुसर्या घरात ठेवण्यात आले होते. या गोंडस मुलीची शुर्शूषा तिची मावसआजी मथुराबाई म्हसू इथापे या करीत होत्या. बुधवारी ही बालिका 12 दिवसांची झाली होती.
अशी घडली घटना
बाळचंद्र पाटील इथापे यांच्या दोन घरांमध्ये मोकळी जागा आहे. एका घरामध्ये सोनालीला ठेवले होते. दुसर्या घरात इथापे हे सहकुटुंब राहतात. या घराला दोन्ही बाजूंनी दोन दारे आहेत. एक दार रस्त्याच्या बाजूने, तर दुसरे दार दुसर्या घराकडे जाण्यासाठी वापरले जाते. बुधवारी दुपारी आजी मथुराबाई यांनी नेहमीप्रमाणे बालिकेची शुर्शूषा केली. त्यानंतर बालिकेची आई सोनाली हिने बालिकेला पलंगावर झोपी घातले. त्यानंतर घराचे एक दार बंद क रून दुसरे दार फ क्त लोटून सोनाली शौचास गेली. क ाही वेळाने ती घरी परतली असता तिला बालिका पलंगावर दिसली नाही. तिने दुसर्या घरात स्वयंपाक करीत असलेल्या मथुराबाई यांच्याकडे धाव घेऊन बालिकेविषयी विचारणा केली, तेव्हा त्याही चक्रावल्या.
सर्वत्र शोध घेऊन पोलिसांत तक्रार
सोनालीची 11 दिवसांची बालिका भरदिवसा घरातून बेपत्ता झाल्याने पूर्ण परिवार भांबावून गेला. सर्वत्र या बालिकेचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. ही बातमी गावभर पसरल्याने त्यांच्या घरासमोर मोठा जमाव जमला. घटनेची वाळूज पोलिसांना माहिती देण्यात आली. सोनालीचा मावसभाऊ बालचंद इथापे यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सुलतानपूर गाठून अंधार पडेपर्यंत शोधमोहीम राबवली. परंतु कोणताही सुगावा लागला नाही.
लवकरच धागेदोरे मिळणार
पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच धागेदोरे मिळतील. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने यात अंधर्शद्धेसारखा प्रकारही तपासला जात आहे. कोणताही धागा तपासातून सुटू नये, याबाबत काळजी घेतली जात आहे. या कामी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे. संदिपान गवळी, पोलिस निरीक्षक, वाळूज पोलिस ठाणे
घटनास्थळी श्वानपथक
वाळूज पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून क ाढूनही उपयोग न झाल्याने शेवटी श्वानपथक बोलावले. श्वान नयनासह पोलिस जमादार बी.एल.हरणे, ए.टी.खाकरे, एस.एफ राऊत यांच्या पथकाने परिसर पिंजून काढला. मात्र, त्याचाही उपयोग होऊ शकला नाही. त्यानंतरही पोलिस पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे. सर्व प्रकार संशयास्पद असल्याने पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. त्यात बुधवारी रात्रीपासून अमावास्या सुरू झाल्याने अंधर्शद्धेपोटी तर ही घटना घडली नसेल ना, अशी शंकाही ग्रामस्थांत उपस्थित होत आहे.
सोनालीला पहिली मुलगीच
सोनालीचे गंगापूर तालुक्यातील खोपेश्वर हे सासर असून तिचे पती पांडुरंग काकडे हे शेती करतात. मावसभावाकडे बाळंतपणासाठी आलेल्या सोनालीचे हे दुसरे बाळंतपण आहे. तिला पहिली दीड वर्षाची मुलगी (साक्षी) असून दुसरीही मुलगीच झाली. मात्र, ती बेपत्ता झाल्याने सोनाली नि:शब्द झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.