आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजीवन कॉलनीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको परिसरातील नवजीवन कॉलनीत तेवीस वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. नंदिनी लखन रापकर असे तिचे नाव आहे. तिच्या आत्महत्येला सासरकडील मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करत माहेरच्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. 
 
पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर तो ताब्यात घेण्यात आला. रात्री उशिरा सिडको पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...