आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडावंदनाचा मान नगरसेवकच लाटतात, नेत्यांची लुडबुड वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सरकारनेशालेय व्यवस्थापन समित्या स्थापन करताना स्थानिक नगरसेवकांच्या शाळांतील लुडबुडीला लगाम घातला असला, तरी महापालिकेच्या अनेक शाळांत या समित्यांचे अध्यक्ष सर्वसामान्य पालक असूनही स्वातंत्र्यदिनाला झेंडावंदनाचा मान मात्र त्यांनाच दिला जातो. महापालिकेच्या शाळांत ज्यांची मुले शिकत आहेत अशा गोरगरीब पालकांना झेंडावंदनाचा मान मात्र पदाच्या मोठेपणामुळे डावलला जाताना पाहायला मिळते.

मनपाच्या शाळांचा कारभार पाहण्यासाठी शालेय व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या जातात. या शालेय समित्यांना शाळेसंदर्भातील सगळ्याच आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असल्याने सगळ्याच वाॅर्डांत तेथील नगरसेवकांना आपसूक अध्यक्ष केले जायचे. कोणत्याही शाळेत या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झेंडावंदन करीत असतो. १७ जून २०१० रोजी राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यातील शिफारशींनुसार शालेय व्यवस्थापन समित्यांच्या रचनेबाबत महत्त्वाचे बदल केले. त्यानुसार या समितीचा अध्यक्ष हा पालकांतूनच निवडणे बाध्य करण्यात आले. शिवाय मुख्याध्यापक सदस्य सचिव राहतील. या १२ ते १६ जणांच्या समितीत ७५ टक्के सदस्य विद्यार्थ्यांचे आईवडील अथवा पालक राहतील उर्वरित २५ टक्के सदस्यांत स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणजे नगरसेवकाचा समावेश राहील असे स्पष्ट म्हटले आहे.

प्रत्यक्षातचित्र वेगळेच : मनपाच्या७२ शाळांत शालेय शिक्षण समित्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी नगरसेवकांची लुडबुड सुरू असते. गणवेश खरेदीसारखे आर्थिक विषय हे नगरसेवक अतिशय रस घेऊन लावून धरतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेक ठिकाणी गणवेशांचे काम नगरसेवकांच्या जवळच्यांनाच दिले जाते. शिवाय नगरसेवक म्हणून सर्वसामान्य पालकांना डावलून जवळपास समितीच ताब्यात घेतल्यासारखी काही नगरसेवकांची वर्तणूक पाहायला मिळत आहे.

राष्ट्रध्वजाचा मान सामान्यांना नाहीच
अनेकशाळांत शालेय समित्यांचे सदस्य असताना नगरसेवकांना तेथील प्रत्येक कार्यक्रमात मानाचे पान हवे असते. त्यामुळे राष्ट्रीय दिनांना झेंडावंदनाचा लाभही अनेक ठिकाणी या नगरसेवकांनाच मिळत आला आहे. मात्र नियमानुसार शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडेच हा मान दिला गेला पाहिजे.