आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराज्यातून गांजा आणून विकणारी टोळी गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी - Divya Marathi
आरोपी
औरंगाबाद - परराज्यातूनगांजा आणून शहरातील किरकोळ विक्रेत्यांना विकणाऱ्या टोळीचा म्होरक्या गुरू भगवान डोंगरे (४८, रा. सिद्धार्थनगर) याला मिसारवाडीतील एका महिलेसह अटक करण्यात आली. मिसारवाडीतील अबरार कॉलनीत बुधवारी दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून 1 लाख सहा हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 
 
मिसारवाडीत छुप्या पद्धतीने गांजा विक्रीचा धंदा सुरू असल्याची खात्रीलायक माहिती गुन्हे शाखेला खबऱ्याने दिली. त्यानुसार बुधवारी मिसारवाडी परिसरातील अब्रारनगर भागात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अनिल वाघ, विजय पवार, विजय जाधव, आरेफ शेख, नसीम खान, नितीन मोरे, दत्तात्रय गाडेकर, मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, संतोष सूर्यवंशी, विलास वाघ, रितेश जाधव, वीरेश बने, सुलताना शेख, सरिता भोपाळे, शेख बाबर यांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलेे. घराच्या झडतीत १० किलो ४०० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

पोलिस कोठडीतून साखळी समोर येईल 
- अटक करण्यात आलेल्या संशयितांसाठी पोलिस कोठडीची मागणी मागणी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीत या दोघांची विचारपूस केली जाईल. यातून शहरात सुरू असलेली गांजा विक्रीची साखळी समोर येऊ शकते. घटनेचा गांभीर्याने तपास करून ही साखळी पूर्णपणे नष्ट करण्यात येईल
-रामेश्वर थोरात, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 
 
शहरातील तरुण व्यसनाधीन 
शहरातील अनेक गरीब वस्त्यांमधील तरुण व्यसनाधीन होत आहेत, अशी नेहमीच ओरड होते. राजकीय नेतेदेखील वेळोवेळी भाषणात असा उल्लेख करतात. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी या रॅकेटचा शोध घेण्यास सुरुवात केली. याअगोदरही हर्सूल, जिन्सी, सिडको, सातारा परिसरातून गांजा जप्त करण्यात आला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...