आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता नको, आता अकरावीमध्ये सर्वांनाच मिळणार प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात औरंगाबाद गुणवत्तेत आघाडीवर असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढलेला आहे. यामुळे सर्वांना अकरावीत प्रवेश मिळेल एवढी क्षमता शहरात आहे, असे असले तरी महाविद्यालयांना मात्र रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागेल. कारण प्रवेश झाल्यानंतरही हजार ४३७ जागा रिक्त राहणार आहेत.
शालेय जीवनातील अखेरीची परीक्षा म्हणजे दहावी. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश घेण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. प्रवेशाची लगबगही महाविद्यालयांमध्ये पाहायला मिळते. अद्याप गुणपत्रिका मिळण्यास अवकाश असला तरी आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालकांसह विद्यार्थी धडपड करत आहेत. कोणते महाविद्यालय अथवा कोणती शाखा निवडावी यासाठी समुपदेशकांचा सल्लाही घेतला जातो आहे. मंगळवारपासून पालक, विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेत महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेची तयारी करून ठेवली आहे. दहावीनंतर विविध अभ्यासक्रमांची संधी, त्यांची प्रवेश क्षमता पाहता विद्यार्थ्यांसमोर अनेक संधी आहेत. अकरावी प्रवेशाचा विचार केला तर प्रवेश क्षमता विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मोठी आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा राहणार आहे.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
स.भु. महाविद्यालयात फोटोग्राफी, स्पोकन इंग्लिश, मॅनेजमेंट कोर्सेस आहेत. "देवगिरी'त ज्वेलरी डिझायनिंग, जिमॉलॉजी, मल्टीमिडिया अँड अॅनिमेशन शंभर टक्के रोजगार देणारे अभ्यासक्रम आहेत.
जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
औरंगाबाद प्रवेश क्षमता ५७ हजार ७००
कला शाखा ४१ हजार ९२०
विज्ञान शाखा ११ हजार २२०
वाणिज्य शाखा हजार ६८०
संयुक्त ८८०
उत्तीर्ण विद्यार्थी ५३ हजार २६३
४,४३७ जागारिक्त राहतील
आयटीआय, पॉलिटेक्निकचीही संधी : मराठवाड्यासहशहरात आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची क्षमता मोठी आहे. शहरात तीन आयटीआय महाविद्यालयांत प्रवेश क्षमता १२०० एवढी आहे. पॉलिटेक्निक कॉलेजांची संख्या १५ असून त्यांची प्रवेश क्षमता साधारण ५४१५ एवढी आहे.
बातम्या आणखी आहेत...