आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादीच ‘ऑफलाइन’, यादीवर रात्रीपर्यंत काथ्याकूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद महापालिका हद्दीतील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने घेतला खरा, मात्र या प्रवेश पद्धतीचा अनुभवच पाठीशी नसल्याने तब्बल पाच वेळा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यात चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना अवघे दोनच दिवस मिळाले.
 
सोमवारी, १० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर होणारी यादी उत्तररात्रीपर्यंत पालक-विद्यार्थ्यांना ही यादी दिसलीच नाही. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची यादीबाबत होय होय, नाही नाही सुरू होते. या प्रकाराने प्रचंड दमछाक झाली.
 
यंदा प्रथमच पुणे-मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश ऑनलाइन राबवण्यात येत आहेत. एकूण २० हजार ९०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मनपा हद्दीतील ११६ कॉलेजमध्ये एकूण २४ हजार ११० जागांसाठी प्रवेश दिले जात आहेत. या प्रकाराने पालक वर्ग प्रचंड हैराण आहे. कारण सतत मेलवरून तो ही प्रक्रिया मुलांकरवी हाताळत होता. यात ग्रामीण भागातून शहरात अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची मोठी कुचंबणा झाली. जून रोजी सुरू झालेली प्रक्रिया १० जुलैच्या उत्तररात्रीपर्यंत सुरू होती. ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी रात्री अकरा वाजेपर्यंत या सर्व प्रक्रियेचा पाठपुरावा करीत होते. मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी सायंकाळी वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ‘थांबा, आता दिसेल यादी’ एवढे एकच उत्तर देत होते. मात्र तब्बल सहा तास या प्रकरणाचा पाठपुरावा करूनही यादी उर्वरित.पान
 
विद्यार्थ्यांना आज पाहता येईल प्रवेश यादी
विद्यार्थ्यांना अॅप्लिकेशन नंबर टाकून त्यांचा नंबर पाहता येतो. संस्थास्तरावर असलेली यादी उद्या मंगळवार रोजी सकाळपर्यंत पाहता येईल, असे शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी सांगितले.
 
तांत्रिक दोष हे विलंबाचे कारण
सोमवारी सायंकाळी पाच वाजता पहिली प्रवेश यादी जाहीर होईल, असे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी पालक प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर नाव शोधत होते. परंतु उत्तररात्रीपर्यंत ही यादी आलीच नाही. पुण्यात तांत्रिक दोष झाल्यामुळे यादीस विलंब होत असल्याचे शिक्षण विभाग सांगत होता. मात्र नेमका काय तांत्रिक दोष आहे, हेही त्यांना सांगता येत नव्हते. प्रत्येक वेळी अाणखी अर्ध्या तासात यादीत दिसेल, असेच सांगितले जात होते. रात्री १२ वाजले तरी यादी ऑनलाइन आलीच नाही.
 
प्रवेश प्रक्रियेचे झोन प्रा. डॉ. आर. बी. गरुड यांच्याशी झालेला थेट संवाद

Q- ५ वाजता यादी जाहीर होणार होती. रात्री वाजले तरी ती जाहीर का झाली नाही?
A- २० हजारच्या वर विद्यार्थ्यांची नावे, आडनावे, संवर्ग आणि इतर अनेक बारीकसारीक गोष्टीतील त्रुटी दुरुस्त करताना वेळ लागला. त्यामुळे हा उशीर झाल्याचे पुण्यातील तंत्रज्ञांनी सांगितले.
 
Q- प्रवेशाचे मेरिट कसे ठरवले?
A- विद्यार्थ्यांनी कॉलेजचे जे विकल्प दिले होते त्यानुसार मेरिट ठरवावे लागले.
 
Q- कोणते कॉलेज आघाडीवर आहे?
A- तसे आताच सांगता येणार नाही. कारण प्रत्येक कॉलेजच्या लॉग इनला ही यादी आपोआप ऑनलाइन पद्धतीने वर्ग झाली.
 
Q- मुला-मुलींचीसर्वाधिक पसंती कोणत्या कॉलेजला आहे?
A- तेही आताच सांगता येणार नाही. कॉलेजचे लॉग इन उघडल्यावर ते कॉलेजच जागू शकेल.
 
Q- मग तुम्ही काय सांगू शकाल?
A- आता जनरल मेरिटची यादी जाहीर केली जाणार आहे. यात संवर्गानुसार आरक्षण दिसेल. बाकी सर्व कॉलेजच्या लॉग इनला दिसणार आहे. मुलांची-मुलींची पसंती हेदेखील ते ते कॉलेजेस सांगू शकतील.
 
Q- विद्यार्थ्याचे नाव जाहीर यादीत नसेल तर त्याने काय समजावे?
A- पहिल्या यादीत नाव नसेल तर विद्यार्थ्याने घाबरण्याचे काम नाही. कारण ही जनरल मेरिट लिस्ट आहे. उदाहरणार्थ एखाद्या महाविद्यालयात अकराशे जागा असतील आणि तेथे २२ शे विद्यार्थ्यांचे अर्ज आले असतील तर मेरिट प्लस राखीव संवर्गानुसार विचार केला जाऊन दुसऱ्या राउंडमध्ये त्या उरलेल्या मुलांची यादी येईल. अशी प्रक्रिया पुढे सुरू राहील.
 
असे पहा तुमचे नाव, महाविद्यालय
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या http://aurangabad.11thadmission.net या पोर्टलवर उजव्या बाजूला स्क्रोल होणाऱ्या चेक रिझल्ट या लिंकवर क्लिक केल्यानंतर विंडोमध्ये विद्यार्थ्याने त्याचा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर त्याला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला हे कळू शकेल. त्याचे प्रिंट काढून संबंधित महाविद्यालयात गेल्यास त्या रिसिटच्या आधारे त्याला प्रवेश दिला जाईल. अर्थात हे पोर्टल सुस्थितीत चालले तरच हे शक्य आहे.
बातम्या आणखी आहेत...