आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी अकरावी ऑनलाइन नोंदणीसाठी अंतिम मुदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल - Divya Marathi
फाईल
औरंगाबाद - प्रथमच होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत वारंवार माहिती देवूनही शाळा-कॉलेजांमध्ये होणारा गोंधळ कायम असून,विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय प्रयत्नही करत आहे. मात्र तरी देखील विद्यार्थ्याना संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. उद्या मंगळवार रोजी ऑनलाइन नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे सोमवारी झोन केंद्रावर सकाळीच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
 
पुणे-मुंबईच्या धरतीवर यंदा औरंगाबाद शहरातही अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष आहे. नुकतेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले आहे. ९ जून पासून सुरु करण्यात आलेली विद्यार्थ्यांसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया उद्या मंगळवार २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच असणार आहे.
 
२८ जून रोजी गुणवत्ता यादी ही कॉलेज कोड,शाखानिहाय व रिक्त जागांसह जाहिर करण्यात येईल. २८ व २९ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालये कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज कोडनिहाय पूर्ण शुल्क घेवून प्रवेश करुन ती माहिती संकेतस्थळावर अपडेट करायची आहे.२९ जून रोजी पहिल्या फेरीनंतरच्या कोटा प्रवेशातील रिक्त जागा ऑनलाइन कॉलेजांनी सायंकाळी ६ वाजेपर्यँत कळवायच्या आहेत. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती तपासणीसाठभ् ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे.३० जून रोजी विद्यार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी, हरकती मार्गदर्शन केंद्रांवर लेखी स्वरुपात स्विकारल्या जातील.त्या अर्जाचा नमूना संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.३० जून रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल. १ जुलै रोजी रिक्त जागा कॉलेज लॉगईनमधून ऑनलाइन सरेंडर करता येतील. ५ जुलै रोजी केंद्रिय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.५ ते ७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत केंद्रिय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश करता येतील. ८ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ९ जुलै रोजी विद्यार्थ्यांना भाग दोन अर्जात पसंतीक्रम बदल असल्यास भरता येईल. १३ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी केंद्रीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. या यादीतील प्रवेश १४ जुलै पर्यंत करता येतील. १५ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील व दुसऱ्या फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. १६ व १६ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग दोन मधील पसंतीक्रम बदलात येईल. १९ जुलै रोजी तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. याचे प्रवेश १९ व २० जुलै रोजी करायचे आहेत. २१ जुलै रोजी तिसऱ्या फेरीतील कट ऑफ जाहिर करण्यात येईल. २१ व २२ जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठीचा विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरायचा असल्यास सायंकाळी ५ वाजेपर्यंत भरता येईल. २४ जुलै रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहिर होईल. यातील विद्यार्थ्यांनी २४ व २५ जुलै रोजी चौथ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश करता येतील. २६ जुलै पासून अकरावीचे नियमित वर्ग सुरु होतील.असे केंद्रिय प्रवेश नियंत्रण समितीने कळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...