आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी अंतिम मुदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - यंदा अकरावीसाठी प्रथम ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेतील अडचणी कायम असल्या तरी पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी उद्या गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली आहे. या मुदत पहिल्या फेरीत अलॉटमेंट करण्यात आलेल्या जागांवर विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित करुन ऑनलाइन अपडेट करायचे आहेत.
 
 यानंतर १४ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशिल आणि पहिल्या फेरीचे कट ऑफ http://pune.11thadmission.net या संकेतस्थळावर सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर रिक्त जागा व कटऑफ प्रमाणे पसंतीक्रम विद्यार्थ्यांनी निश्चित करायचे आहेत. १५ जुलै रोजी पुन्हा विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलणे तसेच फॉर्म यापूर्वी भरलेला नसले तर भाग एक आणि भाग दोन भरता येईल.  त्यासाठी १८ जुलै पर्यंत मुदत असेल. केंद्रिय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी २० जुलै रोजी जाहिर करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...