आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या पहिल्या फेरीत अर्धेच प्रवेश, उद्या दुपारी 12 वाजेर्यंत प्रवेशाची मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी १० हजार ४९२ जागा अलॉटमेंट झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात गुरुवारपर्यंत दिलेल्या मुदतीत केवळ अर्धेच म्हणजे ५१३१ प्रवेशच झाले. मग अर्धे विद्यार्थी गेले कुठे तर सेल्फ फायनान्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पसंतीचे विषय देवून भाग पाडले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
यामुळेच कदाचित अर्धेच अॅडमिशन पहिल्या फेरीत झाले आहेत. असेही सूत्रांनी सांगितले. मात्र सायंकाळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेवून उद्या शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक उपसंचालक भास्कर बाबर यांनी दिली.
 
औरंगाबाद शहरात प्रथमच अकरावीसाठी यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्याच यादीत तांत्रिक अडथळे आल्याने प्रवेशाची गुणवत्ता यादी उशीरा जाहिर झाली. यानंतर प्रवेश घेण्यासाठी तीनच दिवस विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. आज प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत होती. सायंकाळी ५ वाजता ही मुदत संपली. परंतु अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने उद्या शुक्रवार १४ जुलै पर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश निश्चित करता येणार आहे. असे शिक्षण विभागाने जाहिर केले आहे.
 
- १४ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत प्रवेश निश्चित करायचा असून, कॉलेजांनी देखील महत्त्वपूर्ण कागपत्रे तपासून प्रवेश त्वरीत करुन घ्यावेत. त्यांनी ही प्रक्रिया सकाळी ७:३० वाजताच सुरु करावी. जेने करुन दिलेल्या वेळेत प्रवेश पूर्ण होतील.
 भास्कर बाबर सहाय्यक उपसंचालक शिक्षण विभाग

 - पहिल्या फेरीसाठी अलॉटमेंट झालेल्या जागा १०,४९२
 - प्रवेश निश्चिती - ५१३१
 - प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या - ५३६१
 - शाखानिहाय झालेले प्रवेश - 
 - कलाशाखा - ११०४
 - कॉमर्स – ८३६
 - सायन्स – २९२८
 - एचएसव्हीसी - २६३
बातम्या आणखी आहेत...