आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात यंदाही मुलींचाच दबदबा; िवभागात बीड आघाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी घाेषित करण्यात आला. यात लातूर विभागाचा निकाल ९१.९३ टक्के लागल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, निकालात मुलींचा दबदबा कायम आहे. ९३.४४ टक्के मुली तर ८७.१९ मुले उत्तीर्ण झाले आहेत.

लातूर विभागात लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असून तीन जिल्ह्यांतून ६१२ महाविद्यालयांतील ६९ हजार ९६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. प्रत्यक्षात ६९ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६४ हजार १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षीच्या तुुलनेत सव्वा टक्क्यांनी जास्त निकाल लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून लातूर विभागाच्या उत्तीर्ण टक्केवारीत सातत्याने वाढ होत आहे. २०११ मध्ये ५६.५७ टक्के निकाल लागला होता. त्यात चढत्या क्रमाने वाढ होत गेल्याने यंदाची टक्केवारी ९१.९३ पर्यंत आली आहे. निकालात मुलींचा दबदबा कायम आहे. ९३.४४ टक्के मुली तर ८७.१९ मुले उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील ६१२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ५० महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात नांदेड-२०, लातूर-१९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ महाविद्यालयांचा समावेश आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

उस्मानाबाद : ११ शाळांचा निकाल शंभर टक्के
उस्मानाबाद | जिल्ह्यातील १४ हजार ३३३ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षेच्या सरासरी टक्केवारीत जिल्ह्याचा टक्का २. ७१ ने वधारला आहे. जिल्ह्याचा निकाल ९१.४७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ११ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, या परीक्षेत ७७८४ मुले व ५८०७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

लातूर : विभाग सातव्या स्थानी
राज्यात आठ विभागीय शिक्षण मंडळे आहेत. निकालाच्या बाबतीत लातूरचा क्रमांक सातवा आहे. ९५.६८ टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण घेऊन कोकण विभाग महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर तर सर्वात कमी ८८.१३ टक्के निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. राज्याचा सरासरी निकाल ९१.२६ आहे. लातूर विभागाचा निकाल ९१.९३ टक्के आहे.

हिंगोली : ९२.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ९ हजार ३२७ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ५९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतील ३०३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील ४६७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतील ६३० उत्तीर्ण झाले असून व्यावसायिक अभ्यासक्रमातील २८० पैकी २५९ उत्तीर्ण झाले आहेत.

बीड : आठ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के
बारावीच्या परीक्षेत दुसऱ्यांदा बीड जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला आला असून जिल्ह्याचा निकाल ९२.५६ टक्के लागला आहे. जिल्ह्यात बीड तालुक्याचा सर्वाधिक म्हणजे ९४.२७ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत ११ हजार ६१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. औरंगाबाद विभागाचा निकाल ९१.७७ टक्के लागला असून बीड जिल्ह्याचा निकाल ९४.२७ टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतून १४८७३, कला शाखेतून १३९३९, वाणिज्य शाखेतून १९४२ तर होकेशन शाखेच्या १५०५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. यात विज्ञान शाखेच्या १४ हजार ८४४, कला शाखेच्या १३८८८, वाणिज्य शाखेच्या १९४१ व होकेशनच्या १४९६ अशी जिल्ह्यातील एकूण ३२ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २९ हजार ७७५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात आठ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

जालना जिल्ह्यातील ९३.४५% मुली पास
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा जिल्ह्याचा निकाल तब्बल ८८ टक्के लागला असून, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ९१.८७ टक्के विद्यार्थी तर घनसावंगी तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजे ८०.४१ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बारावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. जिल्ह्यात उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ९३.४५ टक्के आहे तर मुलांचे प्रमाण ८८.६१ % इतके आहे. मागील चार वर्षापासून जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून दरवर्षी विद्यार्थ्यांना याची सवय लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढत असून बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत आहे.

निकालाचा टक्का वाढला; गुणवत्ता मात्र ढेपाळली
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींनीच निकालात आघाडी घेतली असून तीन टक्क्यांनी हे प्रमाण जास्तीचे आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के असून मुलींचा निकाल ९३.३७ टक्के आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९०.०३ टक्के आहे. या वर्षी निकालाच्या टक्केवारीतून उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले असले तरी गुणवत्तेत फारशी वाढ झाली नसल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९०.६९ टक्के, कला शाखेचा ८६.१७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.६६ टक्के, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा निकाल ८५.४५ टक्के इतका लागला.
बातम्या आणखी आहेत...