आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून बारावीची परीक्षा, कॉपीमुक्तीसाठी 35 भरारी पथके स्थापन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्या मंगळवारपासून १२ वीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा असून कॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा पार पाडण्यासाठी बोर्ड सज्ज असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने सोमवारी देण्यात आली. 
 
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी बोर्डाला घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद विभागातून लाख ६२ हजार ३३७ विद्यार्थी ३६९ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्तीसाठी ३५ भरारी पथके नेमण्यात आली असून, ५६ केंद्रपरीक्षक असतील, अशी माहिती विभागीय सचिव वंदना वाहूळ यांनी दिली. 

जालना जिल्ह्यातील उत्तरपत्रिका पुनर्लेखन प्रकरणासारखा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी उत्तरपत्रिकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २०१५ पासूनच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन आकलन व्हावे, यासाठी दहा मिनिटे अगोदरच प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. 
 
शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेशपत्र दुरुस्ती : दरम्यान प्रवेश पत्रात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी सोमवारपर्यंत विद्यार्थी बोर्डात चकरा मारताना दिसत होते. प्रवेशपत्रातील दुरुस्ती शाळा-महाविद्यालयांनी स्वत: शुल्क भरून करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन त्यांना बोर्डात पाठवण्याची गरज नाही, अशी माहिती बोर्डाने दिली. 
 
मोबाइल वापरास बंदी : दरम्यान परीक्षा केंद्रावर फक्त केंद्र संचालक, कस्टोडियन, सहायक केंद्रसंचालकांनाच मोबाइल वापरण्याची परवानगी असून इतर कोणालाही मोबाइल वापरण्यास बंदी आहे. जर कुणाकडे मोबाइल आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
 
प्रवेशद्वारावर सीसीटीव्हीचे काय ? 
दरम्यान महाविद्यालय आणि शाळांना परीक्षा सुरक्षित व्हाव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. बॅग,चप्पल, बूट हे वर्गाबाहेरच ठेवण्यास सांगितले आहे. तर प्रवेशद्वारावरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या होत्या. याला किती प्रतिसाद मिळेल हे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कळेल. 
 
केंद्र विद्यार्थी संख्या जिल्हा केंद्र विद्यार्थी 
औरंगाबाद      १३१ ६१६३७ 
बीड      ८९ ३८२६५ 
जालना     ६४ २२५२८ 
परभणी      ५४ २७०६७ 
हिंगोली      ३१ १२८४० 
 
गैर मार्गाशी लढा 
-परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत, कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. त्यांना काही अडचणी असतील तर त्यांना बोर्डाच्या हेल्पलाइनवर तसेच समुपदेशकांशी संपर्क साधता येईल. सुरक्षित वातावरणात परीक्षा व्हावी हाच आमचा उद्देश आहे. -शिशिर घोनमोडे, विभागीय अध्यक्ष, बोर्ड 
 
१५ केंद्र विभागात संवेदनशील 
०६ उपद्रवी केंद्र औरंगाबादेत 
२० परीक्षार्थींना लेखनिक 
०२ भरारी पथक शिक्षण विभागाचे 
३५ भरारी पथकांची असेल नजर 
०१ पथक महसूल विभागाचे 
बातम्या आणखी आहेत...