आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

166 जोडप्यांचे शुभमंगल लावून देणारे सिकंदरभाई, जुळलेली मने जोडण्यासाठी घेतात पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुळलेली मने जोडण्यासाठी घेतात पुढाकार, आंतरजातीय लग्नांचाही समावेश, इतरांकडून मिळवून देतात वस्तूरूपी मदत - Divya Marathi
जुळलेली मने जोडण्यासाठी घेतात पुढाकार, आंतरजातीय लग्नांचाही समावेश, इतरांकडून मिळवून देतात वस्तूरूपी मदत
आर्थिक परिस्थिती जेमतेम आणि घरच्यांचा लग्नाला असलेला विरोध आदी कारणांमुळे अनेकजण लग्न करू शकत नाहीत. अशा जोडप्यांचे शुभमंगल करून देण्यासाठी  सिकंदरभाई यांनी पुढाकार घेतला आणि आजपर्यंत वाळूज परिसरातील १६६ जोडप्यांचे त्यांनी लग्न लावून दिले आहेत. कोणतेही शुल्क न घेता केवळ स्थानिक नागरिकांच्या वस्तूरूपी मदतीच्या आधारे सामूहिक विवाह सोहळा पार पाडतात. यामध्ये आंतरजातीय विवाहांचाही समावेश आहे. 

सिकंदरभाई शेख हे रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी. एका अपघातामध्ये त्यांना अपगंत्त्व आले. तरीही ते कुणाच्याही मदतीला धावून जात असल्याने गावामध्ये सर्वपरिचित. दरम्यान, गावातीलच एका मुलीचे केवळ वय झाल्यामुळे लग्न जुळत नव्हते. ही माहिती त्यांच्या कानावर आली आणि त्यांनी गावातीलच प्रतिष्ठित नागरिकांसोबत चर्चा केली आणि त्या मुलीला चांगले स्थळ मिळाले. मात्र, आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिच्या घरचे लोक लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ ठरले होते. अशा वेळी सिकंदरभाई आणि गोरख शेळके पाटील यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निश्चय केला. अशा प्रकारे गोरगरीब, वंचितांचे लग्न या सोहळ्यांमध्ये दरवर्षी व्हायला लागले. 
 
सर्वधर्मीय-सर्वजाती यांचा विवाह 
सन २००५ मध्ये सिकंदरभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक विवाह चळवळ सुरू केली. सुरुवातील ११ मुस्लिम जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर गावातीलच इतर समाजाच्या लोकांनीही आपापल्या समाजातील मुला-मुलींचे विवाह लावण्याचा आग्रह धरला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत मराठा, बौद्ध, मुस्लिम, वाणी, पारधी, मातंग, चांभार, ख्रिश्चन इत्यादी समाजातील मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून होत गेले. 
 
वस्तुरूपी केली जाते मदत 
दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी लागणारा खर्च गावातील नागरिक विभागून करतात. कुणी किराणा माल देतो, तर कुणी कन्यादानाची भांडी. कुणी मंडपाचा, तर कुणी वाद्यवृंदाचा खर्च उचलतो. सन २०१६ मध्ये झालेल्या विवाह सोहळ्यासाठी डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी संपूर्ण किराणा माल पुरवला होता. त्याचप्रमाणे सुरुंग पाटील, मनोहर गवई, राऊत महाराज, लक्ष्मीनाराण राठोड, कृष्णा लोहकरे, प्रवीण दुबिले, नारायण कानडे, जोगेश्वरीचे उपसरपंच नजीर पठाण हे दरवर्षी वस्तूरूपी मदत करतात. 
 
ही आहेत वैशिष्ट्ये 
सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करू इच्छिणाऱ्यांची नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केली जाते. मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षांपेक्षा कमी असणाऱ्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. लग्न सोहळा पार पाडल्यानंतर शासनाकडून मिळणारे १० हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले जाते. अनुदानाचे धनादेश एका कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जातात. तसेच आंतरजातील विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून मिळणारे ५० हजार रुपयांचे अनुदानही मिळवून दिले जाते. 
 
३० जोडप्यांचे आंतरजातीय विवाह
सिकंदरभाई यांनी आतापर्यंत ३० आंतरजातीय विवाह लावून दिले आहेत. त्यामध्ये चांभार-धनगर, मराठा-महार, धनगर-महार, बौद्ध-चांभार, ब्राह्मण-ख्रिश्चन, मुस्लिम-पारधी, वाणी-महार इत्यादी आंतरजातीय विवाहांचा समावेश आहे. २६ मे रोजी २०१६ झालेल्या सामूहिक सोहळ्यात मुस्लिम मुलगा व पारधी समाजाची मुलगी यांच्या विवाह लावून दिला. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते, मुलीच्या घरच्यांचीही लग्नाला संमती होती. मात्र, पैशांअभावी ते लग्न लावू शकत नव्हते. त्यांचे लग्न धार्मिक पद्धतीने न लावता नोंदणी पद्धतीने लावून दिले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, नागरिक आणि सिकंदरभाई शेख यांच्या प्रतिक्रिया ...पाहा लग्नातील काही क्षणचित्रे
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...