आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: 3 लाखांची लाच प्रकरणातील आरडीसी इतवारे, शेख यांना जामीन मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसीबीच्या कार्यालयातून वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना आरडीसी इतवारे हसत होते. - Divya Marathi
एसीबीच्या कार्यालयातून वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना आरडीसी इतवारे हसत होते.
जालना - तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या आरडीसी राजेश इतवारे व खासगी व्यक्ती अतिक शेख या दोघांना शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन दिला. तसेच तपासकामी दर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. 

गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व बचत भवन येथील शासकीय निवासस्थानात सापळा रचून दोघांना अटक केली होती. जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकसंख्या वहीमधील माहिती राष्ट्रीय माहिती केंद्राच्या सॉफ्टवेअरमध्ये भरल्यावर एजन्सीधारकाने या कामाचे ६० लाख ९५ हजार ६२७ रुपयांचे देयक जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले होते. दरम्यान, एवढे बजेट नसल्याचे सांगत ३० लाख रुपये मंजूर करतो परंतु त्यासाठी ३० लाख रुपयांचे १५ टक्केप्रमाणे ४ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरडीसी इतवारे यांनी केली होती. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दोघांना प्रथम न्यायालयीन कोठडीव त्यानंतर जामीन मंजूर केला. 
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...