आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम 40 लाखांचे, निविदा 1 कोटीची, लोखंडी ट्री गार्ड खरेदी निविदा प्रक्रियेत घोळच घोळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सहा महिन्यांपूर्वी मनपातील उद्यान विभागाने संपूर्ण शहरात लोखंडी ट्री गार्ड खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळवली. निविदा मागवण्यात आल्या. या निविदा प्रक्रियेवरच आक्षेप घेण्यात आला आहे. यापूर्वी कुठल्याही कामाचा अनुभव नसणाऱ्याला हे काम देण्यात आले आहे. प्रत्यक्ष काम 40 लाखांचे असताना त्यासाठी निविदा कोटी रुपयांची भरली गेली आहे. 
 
मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. चौकशी होईपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेतील उद्यान विभागाने संपूर्ण शहरात लोखंडी ट्री गार्ड बसवण्यासाठी खरेदी करण्याबाबात प्रशासकीय मान्यता मिळवली. त्यानंतर लोखंडी ट्री गार्ड खरेदी करणे, असा उल्लेख करून निविदेसाठी जाहिरात दिली. 

या कामासाठी ९९ लाख ९९ हजार ४०० रुपये अंदाजपत्रक रकम ठेवण्यात आली. यावर टक्का म्हणजेच ९९ हजार ९९४ रुपये इसारा रकम आणि टक्के अनामत रकम लाख ९९ हजार ९८८ रुपये, तर कामाची मुदत सहा महिन्याची ठरवण्यात आली होती. त्यानुसार निविदा टेंडरिंग पद्धतीने २५ ऑक्टोबर २०१६ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली.
 
 निविदा उघडण्याची खरी तारीख २३ नोव्हेंबर २०१६ अशी होती. पण नियमांना बगल देत निविदा १६ डिसेंबर २०१६ रोजी उघडण्यात आल्या. ज्या निविदेला मान्यता देण्यात आली म्हणजेच मंजुरी देण्यात आली त्यात अनेक त्रुटी असल्याचे डीबी स्टारने केलेल्या तपासातून आढळून आले. 
 
या मुद्यांची होणार चौकशी 
मनपा उद्यान विभागाने हा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांमार्फत आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. पण आक्षेप घेण्यात आलेल्या प्रत्येक मुद्यांवर चौकशी सुरू असल्याने हा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायीच्या बैठकीत पाठवला नाही. 
 
उद्यान विभागाने कोणामार्फत हे अंदाजपत्रक तयार केले, कोणत्या डीएसआरप्रमाणे ट्री गार्डची किंमत आकारण्यात आली, २६ ऑगस्ट २०१६ च्या कार्यालयीन परिपत्रकानुसार - निविदा कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे काय, निविदा प्रकियेत त्या का टाळण्यात आल्या याची संपूर्ण चौकशी केली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
काय म्हणतात जबाबदार 
- आमची रास्त तक्रार पाहून आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. संबंधिताच्या कागदपत्रांची छाननी सुरू केलेली आहे. हर्सूल येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामामध्ये जसा गैरव्यवहार झालेला आहे. त्यात दोषींना जशी शिक्षा सुनावली तशीच शिक्षा यात होईल अशी आयुक्तांकडून अपेक्षा आहे. 
 
चौकशी लावली आहे. 
यासंदर्भात तक्रारप्राप्त झाल्यानंतर आम्ही प्रत्येक मुद्यांवर चौकशी सुरू केली आहे. काही प्रमाणात या तक्रारीत तथ्य आढळले. त्यामुळे मी स्वत: या लक्ष घातले आहे. निविदा प्रक्रियेची चौकशी करूनच काय ते ठरवता येईल. ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त
 
तक्रारीत तथ्य नाही 
निविदा नियमानुसार उघडण्यात आल्या. त्यांना त्यानुसार काम देण्यात आले आहे. ८६५ रुपये प्रतिनग असलेली ट्री गार्ड आम्हाला ७४४ रुपयांना मिळणार आहे. त्यात रॉ मटेरियल आल्यानंतर लेबर चार्ज, फॅब्रिकेशन चार्ज, आयातीचा खर्च, विद्युत बिल बरीच कामे करावी लागतात. हे काम खर्चिक असल्याने त्याची किंमत अंदाजे ८६५ रुपये ठरवण्यात आली होती. यात कोणताही डीएसआर रेट लागू होत नाही. विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा 
 
सध्याच्या प्रचलित दरानुसार ढोबळमानाने हे काम फक्त ४० लाख रुपयांचे अाहे. मनपा उद्यान विभागाने काढलेल्या निविदा प्रक्रियेतील लोखंडी जाळीचे भाव कुणीही इंटरनेटवर पाहिल्यास सत्य समोर येईल, मनपातील निविदेप्रमाणे किलो २० ग्रॅमसाठी लोखंडी अॅगल पट्टीसह ३५ ते ४० रुपये किलो प्रतिनग, लेबर चार्ज मिळून हे प्रतिनग ३५० रुपयेच लागतील. 
 
मात्र, संबंधित निविदेत ११५६० ट्री गार्डची संख्या आहे. त्याची किंमत ४० लाख ४६ हजारांपेक्षा जास्त होत नाही असे असताना कोटी रुपये खर्च कसा येईल, याचे गणित आयुक्तांनी तपासावे अधिकारी आणि ठेकेदारांची मिलिभगत बनलेली ही प्रक्रिया थांबवावी, त्यातून मनपाचे लाखो रुपये वाचतली यात शंका नाही. 
 
ढोबळमानाने काम फक्त ४० लाखांचे 
या कामासाठी सर्वात कमी १४.५ टक्के दराने दाखवण्यात आलेल्या निविदेला मंजुरी देण्यात आली होती. याच दराने संबंधित फर्मने काम करण्यास तयारी दर्शवली. पण प्रत्यक्षात त्यांच्या कामात पुढील काही त्रुटी आहेत. 
 
-खरे पाहता या पुरवठाधारकाकडे आयएसओ प्रमाणित प्रमाणपत्र नाही, आयएसआय मार्क प्रमाणित प्रमाणपत्र नाही. 
 
- लोखंडी ट्री गार्ड पुरवठा केल्याचे प्रमाणपत्र नाही. यापूर्वी कधीही शासकीय कामात अशा प्रकारचा पुरवठा केल्याचे आदेश जोडलेले नाहीत. 
 
- त्यांच्याकडील तांत्रिक बाबींचा उल्लेख दर्शवण्यात आला नाही. 

- ट्री गार्डचे रॉ मटेरियल आल्यानंतर त्यांची बांधणी कुठे आणि कशी करणार याची माहिती दिलेली नाही. 
 
- एसएसआय स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, तसेच डीआयसीचे रजिस्ट्रेशन नाही की सीए अटेस्टेड प्रमाणपत्र, वॉरंटी प्रमाणपत्र नाही. 
 
-  शॉप अॅक्ट परवानामधून ट्री गार्ड सप्लाय करत असल्याचे नमूद नाही. 
यासर्व त्रुटी असतानाही त्यांनी निविदेत भाग घेतला आहे. निविदेतील अटी शर्तीनुसार पहिला लिफाफा उघडताना मागणीप्रमाणे एक लोखंडी ट्री गार्ड चाचणी करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागतो. मात्र नियमाप्रमाणे चाचणीही घेण्यात आली नाही. तरीही दुसऱ्या पॉकेटमध्ये त्यांना कमर्शियल बीटमध्ये उघडण्यात आल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...