आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदापात्रात 50 टन चिंध्या; वर्षातून एकदाच सफाई, चिंध्या न टाकण्याचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण येथील नाथषष्ठीला १८  पासून प्रारंभ होत असून यात्रेनिमित्ताने गोदावरी नदीपात्रात वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी नदीपात्राची स्वच्छता नगर परिषदेच्या वतीने पाच दिवसांपासून करण्यात येत आहे. या पाच दिवसांत नदीपात्रातून ५० टन चिंध्या निघाल्याची माहिती   स्वच्छता विभागाचे विनायक शिर्के यांनी दिली.  

पैठणच्या नाथषष्ठीच्या यात्रेदरम्यान दरवर्षी गोदावरी नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात येते. पाच ट्रॅक्टरच्या साहाय्याने सध्या नाथमंदिराच्या मागील नदीपात्राची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.  स्वच्छतेदरम्यान नदीपात्रातून सुमारे ७० वर ट्रॅक्टर भरून चिंध्या निघाल्या असून साधारण ५० टन या चिंध्या आहेत. पैठणच्या नाथ यात्रेला राज्यभरातून दरवर्षी आठ ते दहा लाख वारकरी शहरात येतात. वारकऱ्यांच्या फडाची व्यवस्था ही गोदावरीच्या वाळवंटासह दक्षिण काशी मैदानात केली जाते. यातील दोनशेच्या वर दिंड्या या गोदावरीच्या वाळवंटात तीन दिवस मुक्कामी असतात. दोनशे दिंड्यातील लाखभर वारकरी या वाळवंटातील दिंड्यात आपली दिनचर्या करत असतात. नदीपात्रातील पाणी  दरवर्षी यात्रेच्या पंधरा दिवस अगोदर खाली करून त्यानंतर नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. पाच दिवसांपासून सफाई करण्यात येत आहे. यातूनच नदीपात्रात पैठणमधील कचऱ्यासह राज्यभरातून दशक्रिया विधीचे साहित्य नदीपात्रात थेट सोडले  जात आहे. 
 
दशक्रियाविधीची घाण नदीपात्रात 
गोदावरी नदीपात्रात  घाण होऊ नये यासाठी कोटी रुपये खर्च करून दशक्रियाविधी घाट तयार करण्यात आला. मात्र या घाटावर जी पूजा केली जाते ती इतरत्र नष्ट न करता थेट नदीपात्रात सोडली जात असल्याने नदीपात्रात चिंध्याबरोबर इतर घाण मोठ्या प्रमाणात टाकली जाते. त्यातूनच आज ५० टनांच्या वर चिंध्या नदीपात्रातून  निघाल्या.  
 
चिंध्या टाकू नये 
- नाथषष्ठीच्या निमित्ताने गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यात येत आहे. या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात चिंध्या निघाल्या असून नागरिकांनी, भाविक वारकऱ्यांनी नदीपात्रात चिंध्या टाकू नये.
- राहुल सूर्यवंशी, मुख्याधिकारी
बातम्या आणखी आहेत...