आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वितरणासाठी बँकांत ४०० कोटी उपलब्ध : निधी पांडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात बँकांकडे वितरणासाठी ४०० कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे काही दिवस वितरणासाठी फारशी अडचण येणार नसल्याचा दावा जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. जुन्या नोटा बंद झाल्यानंतर जिल्ह्यातल्या परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनेची माहिती देताना त्या म्हणाल्या, आतापर्यंत पोलिस प्रशासनासोबत बैठका घेऊन कायदा-सुव्यवस्थेची स्थिती उद््भवू नये याची काळजी घेण्यात आली. गॅस एजन्सी, पेट्रोल पंपचालकांना सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच बँक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
पाचशेच्या नोटांची मागणी
जिल्ह्यात बँकांकडून दोन हजार, शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा देण्यात येत आहेत. मात्र, अजूनही पाचशेच्या नोटा मिळाल्या नाहीत. त्यामुळे शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या ६०० एटीएमचे कॅलिब्रेशन करण्यात आले आहे. नोटा बंद झाल्याचा परिणाम जिल्ह्यातल्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मालवाहतूक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. तसेच परिवहन, हॉटेलच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली.

गर्दीओसरू लागली
गेल्यातीन दिवसांपासून बँकांचे व्यवहार सुरळीत झाले असून खातेदारांची गर्दी ओसरल्याचे चित्र गुरुवारी पाहण्यास मिळाले. तसेच बहुतांश एटीएम सुरू झाल्यामुळे अनेकांना पैसे काढता आले. मात्र, ५०० ची नोट अजूनही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे बँकांना या नोटांची प्रतीक्षा आहे. नोटबंदीचा आज १६ वा दिवस होता.

बँकांत येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे व्यवस्थापनावरील ताण कमी झाला आहे. विशेष म्हणजे शहरातील ९० टक्के एटीएम सुरू असल्यामुळे बँकेतली गर्दी कमी झाली आहे. येत्या तीन दिवसांत वितरणासाठी बँकांना आरबीआयकडून नोटांचा पुरवठा झाल्यास घडी विस्कटली जाऊ शकते, अशी शंका काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
बँकांमध्ये सध्या केवळ दोन हजारांच्याच नोटांचे वितरण केले जात आहे.

बदलासाठी गर्दी नाही
नोटा बदलण्यासाठी २४ तारीख शेवटची असल्यामुळे एक्स्चेंज काउंटरवर गर्दी होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, याबाबत माहिती देताना एसबीआयचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील शिंदे यांनी सांगितले की, सर्वसामान्यांनी अगोदरच त्यांच्या नोटा बँकेत जमा केल्या होत्या. तसेच ज्यांना आवश्यक होत्या त्यांनी नोटा बदलूनही घेतल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी एक्स्चेंज काउंटरवरही फारसे लोक आले नाहीत. तसेच एटीएम सुरू झाल्यामुळे बँकेत येणारी गर्दी कमी झाली असून नोटाबंदीपूर्वी इतर वेळी ज्याप्रमाणे व्यवहार सुरू असतात तशाच पद्धतीने व्यवहार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...