आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५०० च्या 7 कोटींच्या नव्या नोटा सकाळी आल्या, रात्री ९.३० पर्यंत लोकांच्या खिशात कोटी गेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अखेर होय, नाही, होय नाही म्हणता म्हणता पाचशेच्या सात कोटींच्या नव्या नोटा नाशिकच्या टकसाळीतून व्हाया भारतीर रिझर्व्ह बँकेमार्फत शुक्रवारी दुपारी १२ वाजता औरंगाबादमध्ये दाखल झाल्या. फक्त एसबीआय एसबीएच याच बँकांमध्ये त्या पोहोचल्या. यापैकी रात्री ९.३० वाजेपर्यंत पाच कोटी रक्कम संपली देखील. एसबीएचमधील दोन कोटींपैकी काही रक्कम शनिवारी एटीएममध्ये भरली जणार आहे.
शनिवार, रविवार तसेच खुलताबादच्या उरूसामुळे सोमवारी सुटी असल्याने तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी शुक्रवारीच बँका आणि एटीएममधून रक्कम काढली. तीन दिवसांसाठी करन्सी चेस्टमध्ये शंभर कोटी आले पण ही रक्कमच रविवारीच संपणार असल्याचा अंदाज व्यक्त करत सोमवारी मात्र, एटीएमवर खडखडाट भासणार असल्याचे सूत्रांनी सांगतिले. नोटबंदी सुरु होऊन महिना लोटल्यानंतर शुक्रवारी पाचशेच्या नवीन नोटा शहरातील विविध बँकांत दाखल झाल्या. ही रक्कम सात कोटींची असल्यामुळे काही मोजक्यांच ग्राहकांच्या हाती पडली. या नोटा नाशिकच्या कारखान्यातून आल्या आणि शुक्रवारी सुरक्षा बाळगत त्या पहाटेच बँकांना वितरीत करण्यात आल्या. जुन्या नोटेपेक्षा नवी नोट खूप पातळ अन आकाराने थोडी छोटी असून, रंग थोडा राखाडी आहे.

तीन दिवसांसाठी शंभर कोटी आले.. : शनिवार,रविवारआणि साेमवारी सुटी असल्याने आरबीआय नागपूर आणि मंबई येथून शहरातील एसबीएच शहागंज,एसबीआय क्रांती चौक, बँक ऑफ महाराष्ट्र सिडको एन-१ येथील चेस्टमध्ये रक्कम आली. शुक्रवारी शंभर कोटीमध्ये सात कोटी पाचशेच्या नोटा आहेत. त्या सध्या फक्त राष्ट्रीयीकृत एसबीआय एसबीएचकडेच उपलब्ध आहेत. अद्यापही खासगी बँकांत दोन हजारांच्या नोटा आहेत. शहरात दररोज बँका एटीएम मिळून ५० कोटींचे विड्रॉल सुरू आहे. त्यामुळे संभर कोटींची रक्कम दोनच दिवसांत संपणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे सोमवारी एटीएममध्ये खडखडाट होईल.

बडोदा बँकेच्या सुट्या रद्द... : बँकऑफ बडोदाच्या विभागात ९०, तर औरंगाबाद शहरात शाखा आहेत. या बँकेला नाशिक येथील नोटांच्या कारखान्यातून थेट रक्कम आली आहे. बँकेचे शहारातील ११ एटीएम बंद आहेत. या बँकेत मात्र पाचशेच्या नोटा शुक्रवारी आलेल्या नव्हत्या. परिस्थिती लक्षात घेऊन व्यवस्थापनाने शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवस सुट्या रद्द केल्या आहेत. रोकड कमी वापरा कॅशलेस व्यवहार करा अशी शिकवण ही बँक अनेक गावांना देत आहे. या मोहिमेत जालना जिल्ह्यातील विरेगाव सिल्लोड तालुक्यातील भवन गावांना कॅशलेस केल्याचा दावा बँकेने केला आहे.
तुटवडा आहेच
^गरज जास्त आणि पुरवठा कमी अशी पाचशेच्या नोटांची स्थिती आहे. शुक्रवारी एसबीआयच्या प्रत्येक शाखेला ५०० च्या दोन लाखांचा नोटा दिल्या, त्या लवकरच संपतील. मंगळवारी पुन्हा ग्राहकांची ओरड होईल. -नंदकिशोर मालू, सहा.महा व्यस्थापक, एसबीआय

तासांत कोटी वितरित
यानोटा दुपारी बारा वाजता आल्या आणि त्या एटीएममध्ये टाकण्यास दुपारी तीन वाजले. एसबीआयच्या क्रांती चौक या मुख्य शाखेलाच या नोटा वितरीत करण्याचे अधिकार आहेत. दुपारी तीन वाजता अमरप्रीत चौकातील एटीएममध्ये ग्राहकांना प्रथमच एटीएममध्ये पाचशेच्या नव्या नोटा पाहावयास मिळाल्या. काहींनी व्हाॅट‌्सअॅप आणि फेसबुकद्वारे एकमेकांना पाठवल्या.
३१ वादिवस
एसबीएचकडे आले बारा कोटी : शुक्रवारी सकाळीच एसबीएच च्या शहागंज शाखेत तीन दिवसांची सुटी असल्याने बाराकोटी आले पण यात पाचसेच्या फक्त दोन कोटी होत्या. या नोटा शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी एटीएममध्ये टाकण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...