आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परसोड्याजवळ रेल्वे रुळाचा तुकडा पडला निझामाबाद- पुणे रेल्वेगाडीचा अपघात टळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रोटेगाव-परसोडा दरम्यान ६६ क्रमांकाच्या पुलावरील रुळाचा तुकडा पडल्याने निझामाबाद- पुणे एक्स्प्रेसचा अपघात टळला. हा प्रकार शनिवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास निदर्शनास आला. रेल्वे प्रशासनाने तातडीने रूळ जोडणी करून वाहतूक पूर्ववत केली.

नरसापूर -नगरसोल एक्स्प्रेस सकाळी ८.४० वाजता या पुलावरून गेली. तेव्हा फटाक्यांसारखा आवाज झाला. ही बाब प्रवासी रेल्वे प्रवासी सेनेचे जयेश शर्मांच्या लक्षात आली. त्यांनी अध्यक्ष संतोष सोमाणी कळवल्यावर त्यांनी रेल्वे वाहतूक निरीक्षक लक्ष्मण जाखडे यांना सांगितले. शंकर कवडे यांचे शेत या पुलाजवळ असल्यामुळे त्यांनीही हा आवाज ऐकला. त्यांनी गनमॅनला कळवले. दरम्यान, सकाळी ८.५५ वाजताची निझामाबाद रेल्वे थांबवल्याने अनर्थ टळला. रेल्वे अभियंत्यांनी एका तासांत रूळ दुरुस्ती केली. दरम्यान, प्रवाशांना दीड तास ताटकळत बसावे लागले.

महिनाभरापूर्वी पूर्वसूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सोमाणी यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधितांची चौकशी केली जाईल, असे रेल्वे अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगितले.