आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षीय वृद्धेच्या गर्भाशयातून काढला किलोचा गोळा; डॉ. श्रीनिवास गडप्पा यांची यशस्वी शस्त्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मागील वर्षांपासून किलोचा गोळा पोटात घेऊन ७० वर्षीय मालनबाई गवळी जीवन जगत होत्या. ट्यूमर कर्करोगाचा नाही असे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या भीतीने मालनबाईंनी त्याला नकार दिला. तीन वर्षे रक्तस्राव आणि त्रास सहन केल्यानंतर जेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी त्रास असह्य झाला तेव्हा घाटी रुग्णालयात धाव घेतली. २६ एप्रिल रोजी त्यांच्यावर प्रसूती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. 

सिडको परिसरात राहणाऱ्या मालनबाई मागील तीन वर्षांपासून ओव्हेरियन ट्यूमरचा त्रास सहन करत होत्या.  २०१४ मध्ये पहिल्यांदा त्रास जाणवला, तेव्हा घाटीतील डॉ. विजय कल्याणकर यांनी त्यांच्या ट्यूमरचे निदान केले. त्यानंतर कर्करोग रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, हा ट्यूमर कर्करोगाचा नसल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा कुटुंबीयांच्या जिवात जीव आला. असे असले तरीही ट्यूमर काढायला हवा, असे डॉक्टरांनी सांगितले. 

मात्र, शस्त्रक्रियेविषयी प्रचंड भीती वाटत असल्याने मालनबाईंनी त्रास सहन करणे पसंत केले. आता हा त्रास सहनशीलतेपलीकडे गेल्याने लहान मुलगा अनंत गवळी यांनी शस्त्रक्रियेसाठी आईला तयार केले. १८ एप्रिल रोजी घाटीच्या आंतररुग्ण विभागात त्या दाखल झाल्या. २६ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया झाली. 

घाटी रुग्णालयाच्यानावाने सगळेच बोंबाबोंब करतात; पण आमचा अनुभव वेगळा आहे. शस्त्रक्रियेसाठी आईची मानसिकता तयार करण्यात डॉ. गडप्पांचे मोलाचे योगदान तर आहेच; पण भावनिक दिलासा मिळाल्याने आमची आई आता चांगले आयुष्य जगू शकणार आहे.
- अनंत गवळी, मालनबाईंचा मुलगा. 
 
बातम्या आणखी आहेत...