आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार सत्तेतून खाली खेचेल, तेव्हाच डोक्यावर केस ठेवील : आमदार सत्तार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- केंद्रातील भाजप सरकार मूठभर उद्योगपतींचे सरकार असून जेटली व प्रधानमंत्री मोदी म्हणजे चहाची केटली असून या सरकार विरोधात सध्या जनता पेटली आहे.  त्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. महाराष्ट्रातील फेकेंद्र सरकारला आता खाली खेचण्याचे काम  सामान्य नागरिकांना करावे लागणार असून हे सरकार  सत्तेतून खाली येत नाही तोपर्यंत म्हणजे २०१९ पर्यंत मी डोक्यावर केस ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा आमदार अब्दुल सत्तार यांनी आज पैठणमध्ये आयोजित काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चात घेतली.   या वेळी आमदार सुभाष झांबड, माजी मंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, केशवराव तायडे, विलास औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. 

 
 यात पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी जालन्याचा पुढील खासदार हे अर्जुन खोतकर असतील. तेव्हा   दानवे यांनी माझ्या विरोधात आमदारकी लढवावी. मीच ५० हजार मतांनी निवडून येईल, असे आव्हानही दिले.  खोतकर खासदार होताच पैठणला रेल्वे येणार असेही त्यांनी सांगितले.   मोदींनी नोटा रद्द केल्या मात्र भाजपचे दानवे यांनी १५ टक्के कमिशन घेऊन नोटा बदलून दिल्याचा आरोपही त्यांनी केला.  चार-पाच उद्योगपती श्रीमंत झाले त्यात योगगुरु रामदेव बाबा कसा श्रीमंत झाला, असा सवालही सत्तारांनी केला.    

 

आमदाराने पैठणचे वाटोळे केले
माजी मंत्री अनिल पटेल यांनी पैठणच्या आमदारावर टीका करताना या आमदाराला काही नियोजनाचे कळत नाही. पैठणच्या प्राधिकरणाचा पैसा इतरत्र खर्च करत असून यातच पैठणची वाट लागल्याचे ते म्हणाले. या वेळी नामदेव पवार, जितसिंग करकोटक यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणे झाली. या वेळी निमेश पटेल, अजित पगारे, फाजल टेकडी, जालिंदर आडसूल, रतनलाल गारदे, रफीक कादरी, अमोल भागवत, लक्ष्मण सपकाळ, युनूस शेखसह तालुक्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...