आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये कामासाठी आलेल्या तरुणाचा बसच्या धडकेत मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - शहरात कामाच्या शोधात आलेल्या तरुणाचा चिकलठाणा विमानतळाजवळ एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी अंत झाला. संतोष नारायण पवार (२४, रा. जातवा, ता. फुलंब्री) असे त्याचे नाव आहे. 
 
संतोष हा त्याचा चुलत भाऊ गणेश आणि भारत पवार यांच्यासोबत चिकलठाणा येथे जुन्या दुचाकी खरेदी-विक्रीचा बाजार बघण्यासाठी आला होता. त्याला दुचाकी विकत घ्यायची होती. रस्ता ओलांडत असताना संतोषकडे इलेक्ट्रिक साहित्याची पिशवी होती. एका दुचाकीने हूल दिल्याने पिशवी खाली पडली त्यातील साहित्य रस्त्यावर पडले. ते उचलत असताना औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या औरंगाबाद-निजामाबाद बसच्या (एम २० बीएन ३५९८) पुढील चाकाखाली चिरडल्याने संतोष जागीच ठार झाला. अपघाताची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

संतोष गावाकडून महिनाभरापूर्वी शहरात आला होता. मित्रांसमवेत तो एन-६ भागात भाड्याने राहत होता. एका ठेकेदाराकडे सर्व मित्र लाइट फिटिंगचे काम करत होते. संतोषचे वडील शेतकरी आहेत. 

पडेगाव अपघातातील लष्कराचा ट्रक गायबच 
दरम्यान,पडेगाव येथे शनिवारी लष्कराच्या ट्रकने एका दुचाकीला उडवले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. पती आणि तीन वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. छावणी पोलिसांनी या ट्रकचा रविवारी दिवसभर शोध घेतला. मात्र ट्रक चालक पोलिसांना सापडला नाही. 
बातम्या आणखी आहेत...