आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : कंटेनर-कारच्या धडकेत एक ठार, आसेगाव फाटा येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दौलताबाद - नागपूर-मुंबई महामार्गावरील आसेगाव फाटा येथे कंटेनरच्या धडकेत इनोव्हा कारमधील एक जण जागीच ठार झाला, तर तिघे जखमी झाले. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. इस्तेहाक शरीफ शहा (३०, रा. नारेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
 
इनोव्हा कार (एमएच २० बीटी ८०१५) लासूर स्टेशनकडून औरंगाबादच्या दिशेने येत होती. तेव्हा समोरून येणाऱ्या कंटेनरने (एमएच २० एटी ९३०१) आसेगाव फाटा येथील एका हॉटेलसमोर कारला जोरदार धडक दिली. या अपघातात इस्तेहाक शहा हा जागीच ठार झाला, तर हिना शेख (३०), शेख जावेद शेख कासम (३२), शेख बादशहा मुबारक (सर्व रा. औरंगाबाद) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी रावसाहेब राठोड, अशोक बोर्डे, बाजीराव पगारे, कचरू फुलरे यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे घाटीत दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...