आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या ट्रकची दुचाकीस धडक; महिला जागीच ठार, पती अन् मुलगी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ येथे दर्शन घेऊन काढलेले शेवटचे छायाचित्र. - Divya Marathi
वेरूळ येथे दर्शन घेऊन काढलेले शेवटचे छायाचित्र.
औरंगाबाद - छावणी परिसरातून भरधाव जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकने वेरूळ येथून दर्शन करून येणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला धडक दिली. यात ३० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर पती आणि मुलगी जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पडेगावच्या जकात नाक्याजवळ घडली. दीपिका अविनाश तेजनकर (रा. शहानूरवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती अविनाश शिवाजी तेजनकर (३५) मुलगी ईश्वरी (३) जखमी झाले. 
 
महावितरणमध्ये कार्यरत असलेले लिपिक अविनाश तेजनकर हे पत्नी दीपिका अणि मुलगी ईश्वरी यांच्यासह शनिवारी खुलताबाद येथे भद्रा मारुती वेरूळ येथे घृष्णेश्वराच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून शहरात परत येत असताना पडेगाव येथील जकात नाक्यासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या लष्कराच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दीपिका या दुचाकीवरून रस्त्यावर फेकल्या गेल्या. वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या, तर पती मुलगी दुसऱ्या बाजूला पडल्याने ते जखमी झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले होते. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत शिवाजी ईश्वरी यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. दीपिका यांचा मृतदेह छावणी पोलिसांनी त्यांच्या वाहनाने घाटीत आणला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, छावणी आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 
 
वाहन घेऊन चालक झाला पसार 
लष्कराच्या ट्रकचालकाने भरधाव निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिली. त्यानंतर तो थांबला नाही. वाहन थांबवले जरी असते तर दीपिका वाचल्या असत्या. मात्र ट्रक भरधाव असल्याने त्या चाकाखाली चिरडल्या गेल्याचे प्रत्यदर्शींनी सांगितले. ही सर्व घटना दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या जकात नाकावरील सीसीटीव्हीत कैद झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचाही तपास करण्यात येईल. पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी ते वाहन लष्कराचेच असल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...