आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात दोन जण ठार, दोन जखमी, वैजापूर-औरंगाबाद मार्गावरील किन्हळ फाट्यावरील दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- गोदावरी दूध घेऊन जाणारा भरधाव आयशर टेम्पो उभ्या अज्ञात वाहनाला धडकून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास वैजापूर-औरंगाबाद मार्गावरील किन्हळ फाट्यावर घडली आहे. 

या अपघातात दुधाच्या आयशरमधील वसत एकनाथ तुरकणे (४३) किंनर राहणार बोलकी, ता. कोपरगाव आणि प्रवासी प्रदीप फकीरचंद गायकवाड (३०) असे दोघे या अपघातात ठार झाले तर प्रवासी सोनाली प्रदीप गायकवाड, रा. वैजापूर, सुनील किसन बोरकर चालक राहणार बाह्मणगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

कोपरगाव येथून औरंगाबादकडे गोदावरी कंपनीचे दूध घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक (एम.एच.१७.बी.डी. ५२६६) हा भरधाव वेगाने जाताना अचानक अज्ञात उभ्या वाहनाला पाठीमागून धडकल्याने हा अपघात वैजापूर -औरंगाबाद रस्त्यावरील किन्हळ फाट्यावर घडला. या अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली.
 
बातम्या आणखी आहेत...