आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अादिवासी खेळाडूंची चप्पल-संॅडल घालून मानवंदना बूट-ट्रॅक सूटविनाच संचलन; स्पर्धाही दोन तास उशिरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कोणाच्या पायात चप्पल, तर कोणाच्या पायात संॅडल...कोणी उंचीपेक्षा छोटा ट्रॅक सूट घातलेला, तर कोणी मोठा... अादिवासी समाजातील हाेतकरू मुलांची गुणवत्ता हेरून त्यांना अांतरराष्ट्रीय पातळीपर्यंत चमकवण्याच्या प्रयत्नांना नाशिकमध्येच सुमधूर फळे लागलेली असताना बुधवारी (दि. २९) आदिवासी विकास विभागाने अायोजित केलेल्या शासकीय अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना बूट-ट्रॅकसूटसारख्या किमान सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसले. या स्पर्धेसाठी लाखो रुपयांचा खर्च करूनही नियोजन मात्र शून्य असल्याचेही दिसून आले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या बूट आणि ट्रॅक सूट खरेदीत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


दरम्यान, नियोजनाच्या अभावामुळे आयोजकांचा गोंधळ उडाला होता. स्पर्धेचे कोणत्याही प्रकारचे व्यवस्थित नियोजन केलेले नसल्याने आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना सामन्यांच्या प्रतीक्षेत बराच काळ भरउन्हात ताटकळत बसावे लागले. 


या क्रीडा स्पर्धांची सुरुवात पंचवटीतील नाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात झाली. भरदुपारी बारा वाजता आदिवासी विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद‌्घाटन करण्यात आले. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत एकही सामना खेळला गेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हात बसावे लागले. तसेच, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे बूट, ट्रॅक सूट इतर सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दिवशीही बूट देण्यात आलेले नव्हते. स्पर्धा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विद्यार्थ्यांंना बूट आणि ट्रॅक सूट देण्यात आले. यातही अनेक विद्यार्थ्यांना देण्यात आलेले बूट पायाच्या मापापेक्षा मोठे, तर अनेकांचे छोटे होते. यामुळे या विद्यार्थ्यांनी बूट घालताच स्पर्धेत भाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. 


आदिवासी मंत्र्यांची दांडी 
याविभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद‌्घाटनासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आदिवासीमंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव अत्राम, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार होते. मात्र, आदिवासीमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याने आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद‌्घाटन करावे लागले. 


या हाेणार स्पर्धा 
अादिवासी विकास विभागातर्फे हाेत असलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत नाशिक, नंदूरबार, कळवण, राजूर, यावल, तळाेदा, धुळे या सात प्रकल्पातील २६३६ खेळाडू सहभागी झाले अाहेत. या स्पर्धेत धावणे, उंच उडी, गाेळाफेक, भालाफेक, थाळीफेक, कबड्डी, खाेखाे, व्हाॅलीबाॅल, हॅन्डबाॅल, रिले या स्पर्धा हाेणार अाहेत. ही स्पर्धा तीन दिवस रंगणार अाहे. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी खेळाडू सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार अाहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण सभारंभ शुक्रवारी (दि. १) सायंकाळी हाेईल. 

 

साहित्य का मिळाले नाही, याची माहिती घेऊ 
शालेय जीवनातच क्रीडा नैपुण्य जोपासायला हवे. त्यातूनच पुढे चांगले खेळाडू घडू शकतील. खेळांमध्ये चांगली चुणूक दाखविणाऱ्या खेळांडूना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्व साहित्यासंदर्भात माहिती घेतली जाईल. आधी या साहित्याचे वाटप का झाले नाही याचा जाब विचारणार. 
- रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी विकास आयुक्त 

बातम्या आणखी आहेत...