आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजवंत 50 मुलींना घेतले दत्तक, सामाजिक बांधिलकीतून स्वराज्य फाउंडेशनची जिजाऊ दत्तक योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - सामाजिक बांधिलकी जपत व्यवसाय करणारांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यातीलच स्वराज्य फाउंडेशन हे एक आहे. या फाउंडेशनने जिजाऊ दत्तक योजना सुरू केली आहे. पोलिस होण्याची जिद्द आहे, परंतु घरची परिस्थिती हलाखीची, दूर गावातून जालन्यात येण्याचा खडतर प्रवास या विविध कारणांमुळे पोलिस प्रशिक्षण अधुरे राहात असलेल्या निवडक पन्नास मुलींना प्राथमिक प्रशिक्षणापासून ते पोलिस भरती होईपर्यंत दत्तक घेऊन इतर व्यावसायिकांसमोर महिला दिनाच्या औचित्यावर एक आदर्श निर्माण केला आहे. 
स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने नेहमी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यापूर्वी माणुसकीची भिंत, अर्ध्या रकमेत पुस्तके, गरजवंत, वंचित घटकांतील विद्यार्थी - विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण आदी उपक्रम राबवतात. या उपक्रमासाठी प्रा. विजय सुरासे हे परिश्रम घेतात. ५० मुली दत्तक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. बी. वाय. कुलकर्णी, प्रा.मुकुंद कुलकर्णी, प्रा. विजय सुरासे, गणेश दाभाडे आदींची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून इतर शैक्षणिक संस्थांनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. 
बातम्या आणखी आहेत...