आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : छत्रपतींच्या पुण्यतिथीला ढोल वाजवल्याच्या निषेधार्थ तावडेंची \'पुण्यतिथी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावर ढोल वाजवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विविध स्तरातून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी या कार्यक्रमातून अंग काढून घेतले. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला काही जणांनी रायगडावर ढोल वाजवले. त्याच्या निषेधार्थ औरंगाबादेत बुधवारी विनोद तावडेंची प्रतिकात्मक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने औरंगाबादेत बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रतिकात्मक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीचौक येथे रस्त्यावर भीक मागणाऱ्या छोट्या मुलांना बोलावून त्यांना गोड जेवण देण्यात आले. तसेच निषेध करण्यासाठी क्रांती चौक येथे ढोलही वाजवण्यात आले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 

 
 
बातम्या आणखी आहेत...