आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनौत नगर जिल्हा परिषदेचा गौरव; जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांनी स्वीकारला पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ येथील सोहळ्यात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपाध्यक्ष राजश्री घुले अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. - Divya Marathi
लखनौ येथील सोहळ्यात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपाध्यक्ष राजश्री घुले अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
नगर- केंद्र सरकारच्या पंचायत राज सशक्तीकरणात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषद, राहुरी पंचायत समितीसह दोन ग्रामपंचायतींना सोमवारी उत्तरप्रदेशमधील लखनौत झालेल्या समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

केंद्र सरकारने २०१५-२०१६ या वर्षातील पंचायत राज सशक्तीकरण, राष्ट्रीय ग्रामगौरव पुरस्कार, मनरेगा पुरस्कारासाठी (२०१७) प्रस्ताव मागवले होते. त्यात महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या १४ ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले. जिल्ह्यातील राहुरी पंचायत समिती, लोणी बुद्रूक ब्राह्मणी या ग्रामपंचायतींची निवड झाली. स्वच्छता कार्यक्रम, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, दुर्लक्षित घटकांना न्याय, सामाजिक क्षेत्रातील कामगिरी, उत्पन्नवाढीसाठी नावीन्यपू्र्ण उपक्रम, ई-गव्हर्नन्स आदी अनेक बाबी तपासून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रशांत शिर्के, राहुरीचे गटविकास अधिकारी इशाधिन शेळकंदे रवाना झाले होते. त्यानंतर अध्यक्ष विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे यांच्यासह इतर पदाधिकारीही रवाना झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. यावेळी उत्तरप्रदेशचे मंत्री केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, पेयजल, स्वच्छता ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर आदी उपस्थित होते.
 
देशभरात दीडशे पुरस्कार प्रदान 
लखनौ येथे पुरस्कारासाठी देशभरातील सुमारे दीडशे जिल्हा परिषदांसह पंचायत समित्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातून एकमेव नगर जिल्हा परिषदेचा त्यात समावेश होता. जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले. जिल्हा परिषदेचे काम राज्यात पथदर्शी ठरले आहे. 
बातम्या आणखी आहेत...