आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज पाटीलांच्या नावावर, प्रॉपर्टी तंगेंची, फेडण्याचे पत्र दिले दांगोटेंनी, वाचा कर्जाबाबत घोळात घोळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांनी संबंधित जमिनीवरील कर्जाचा बोजा उतरवला जावा म्हणून तलाठ्यांना असे पत्र दिले होते. - Divya Marathi
बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांनी संबंधित जमिनीवरील कर्जाचा बोजा उतरवला जावा म्हणून तलाठ्यांना असे पत्र दिले होते.
७० लाखांचे कर्ज घेणाऱ्याचे नाव पाटील, कर्जाचा बोजा विनोद तंगे यांच्या नावावर, फेडण्याची जबाबदारी घेताहेत कल्याण दांगोडे. प्रत्यक्षात कर्जाची सेटलमेंट झाल्याचे बँक सांगते. मात्र, या सर्वांनीच पाठवलेले पत्र आणि या कर्जाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे कर्ज नेमके घेतले कुणी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश मंडळी या बँकेची कर्मचारी होती. त्यामुळे बँकेने प्रकरणात सारवासारव करण्यापेक्षा दोषी शोधून कारवाई करणे अपेक्षित आहे. 
 
वडगाव कोल्हाटी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गट क्रमांक आणि मधील जमिनीवर अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने दिलेल्या ७० लाख रुपयांच्या कर्जाबाबत घोळच घोळ असल्याचे डीबी स्टार तपासात पुढे आले आहे. ज्या तंगे यांच्या नावावर हे कर्ज होते ते तंगे या कर्जाशी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगतात. प्रत्यक्षात हे कर्ज कल्याण दांगोडे यांनी घेतल्याचे पत्रच त्यांनी बँकेला २० जानेवारी २०१७ रोजी दिले. तर, दांगोडे यांनी हे संपूर्ण कर्ज मीच फेडणार असल्याचे पत्र दिले. दुसरीकडे त्यांना विचारले तर या कर्जाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे दांगोडे सांगत आहेत. तर तिसरीकडे तलाठ्याला या जागेवरील कर्जाचा बोजा उतरवला जावा, असे पत्र आम्ही दिल्याचे बँक म्हणत आहे. त्यामुळे कर्ज नेमके घेतले कुणी, ही बाब अजूनही अनुत्तरित आहे. विशेष म्हणजे पत्रांचा घोळ घालणारी ही बहुतांश मंडळी या बँकेची कधीकाळी कर्मचारी होती, हे आणखी एक धक्कादायक वास्तव यातून समोर आले आहे. शिवाय दिलेली पत्रे या लोकांच्या नावाने असूनही त्यांनी ती नाकारली आहेत. अशा वेळी बँक मात्र ‘सेटलमेंट’ झाली, असेे म्हणत आहे. 
वडगाव कोल्हाटी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बिल्डर विनोद चंद्रकांत तंगे यांनी गट क्रमांक आणि मध्ये २०११ मध्ये जमीन खरेदी केली होती. त्यावर सुमारे ११० प्लॉटचे रेखांकन करून ते त्यांनी परिसरातील नागरिकांना विकले. अनेक कामगारांनी हे प्लॉट घेतले. साधारण २०१२ पर्यंत सर्वच प्लॉट विकले गेले. अनेकांनी तेथे घरेही बांधली. नोटरी करून वडगाव कोल्हाटी या ग्रामपंचायतीकडून या लोकांनी टॅक्सचाही भरणा केला. मात्र, अचानक १५ मे २०१३ रोजी अजिंठा को-ऑपरेटिव्ह बँक लि. या बँकेकडून हीच जमीन गहाण ठेवून ७० लाखांचे कर्ज घेण्यात आले. कर्जाचा हप्ता मिळत नसल्याने बँकेनेच ३० डिसेंबर २०१६ रोजी दैनिकात तसे जाहीर प्रगटन दिले. ही जमीन गहाण असून तिची खरेदी-विक्री करू नये, हे त्याद्वारे जाहीर केले. त्यामुळे ज्यांनी या जमिनीवर रीतसर प्लॉट घेतले होते ते नागरिक चांगलेच हादरले. पै-पै जमा करून घेतलेली घरे आता जातात की काय, या भीतीने त्यांनी थेट बँकेत धाव घेतली. तेव्हा बँकेने नागरिकांना दिलासा देत प्रकरण सेटल होत असल्याचे सांगितले. दरम्यान, ७० लाखांचे कर्ज प्रकरण इतके सोपे नसल्याचे डीबी स्टारच्या तपासात समोर आले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, हे होते बँकेचे कर्मचारी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...