आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: महिला पोलिसांची दबंगगिरी, अवैध दारू विक्रेत्याला चार्लींची मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवैध दारू विक्रीच्या संशयावरून भोईवाड्यात रिक्षाचालकाला भररस्त्यात मारहाण करताना महिला चार्ली पोलिस. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
अवैध दारू विक्रीच्या संशयावरून भोईवाड्यात रिक्षाचालकाला भररस्त्यात मारहाण करताना महिला चार्ली पोलिस. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद- अवैधदारू विकणाऱ्या व्यक्तीने महिला चार्लींसोबत अरेरावी केल्यामुळे दोघींनी मिळून मारहाण केली. हा प्रकार भोईवाडा येथे मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. महिला चार्ली रविता पवार आणि आम्रपाली अंभोरे या भोईवाडा परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक जण अवैधरीत्या दारू विकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची चौकशी केली असता, तो अरेरावीवर उतरला. महिला चार्लींनीदेखील आपला पोलिसी खाक्या दाखवत त्याला भररस्त्यात मारहाण केली.

हे नाट्य सुरू असताना लोकांची गर्दी जमली. काहींनी तर आपल्या मोबाइलमध्ये घडलेला प्रकार शूट केला. काहींनी फोटोही काढले आणि सोशल नेटवर्किंग साइटवर टाकले. मी दारू विक्रेता नसून रिक्षाचालक आहे, असे त्याने सांगितले; पण त्याचे काही ऐकता त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांकडून दुजोरा
याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना विचारले असता ते म्हणाले, तो दारू विकत आहे. महिला कर्मचाऱ्यांशी त्याने गैरवर्तणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या, असेही आघाव यांनी सांगितले. या प्रकरणी अण्णा किसन भुजंग आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, महिला चार्लींच्या दबंगगिरीचा व्हिडिओ