आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात विविध अपघातांत चार जण ठार, पाच जखमी, देवगावजवळ कार झाडाला धडकून एक जागीच ठार, दोन जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औराळा- दौलताबादहून तेराव्याचा कार्यक्रम आटोपून घरी नाशिककडे परतत असताना कारचे टायर फुटल्याने ती देवगावजवळील हाॅटेल पद्मावतीसमोरच्या झाडाला धडकली. या अपघातात कारमधील समोरच्या सीटवर बसलेल्या पुष्पा श्रीहरी पवार, (५५, रा. नाशिक) या जागेवर ठार झाल्या, तर त्यांचे पती श्रीहरी सखाराम पवार (५८, रा.लामणगाव, ता.कन्नड हल्ली मुक्काम नाशिक) हे व नारायण जाधव (रा. शिऊर, ता.वैजापूर) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
 
श्रीहरी सखाराम पवार हे नाशिक महानगरपालिकेमध्ये मुख्य अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. अपघाताची माहिती मिळताच देवगाव पो.स्टेशन चे स.पो.नि.राजश्री आडे, पो.ना.बि.के.चरावंडे, एस.बी.साबळे, वाय.एस.थोरात, चेळेकर, महामार्ग पोलिसांनी व ग्रामस्थांनी मदत केली. 
 
टेम्पो - दुचाकीची धडक, एक ठार 
शिऊर - शिऊर बंगला येथून वैजापूरकडे जात असताना  ब्रेक न लागल्याने टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शिऊर नजीक सुदामवाडी फाट्यावर घडली.
 
वैजापूर येथील टेम्पो (एमएच १० ए ५४८२) मालेगाव येथून शिऊर मार्गे वैजापूर येथे जात होता. त्याचवेळी शिऊर बंगलाकडे जाणारी दुचाकी    ( एमएच ०५ एक्स ७३२५) यात धडक झाली. या वेळी जोरदार धडकेने दुचाकी टेम्पोखाली जाऊन अडकली. दुचाकीस्वार अडकल्याने विलास खैरनार व अंकुश पठारे (दोघे रा.विटा) हे गंभीर जखमी झाले होते.
 
दुचाकी अपघातात महिला ठार  सिल्लोड 
- मंगरूळ फाट्यानजीक वाहनाने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकल्या जाऊन पाठीमागून आलेले वाहन अंगावरून गेल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला. 
मंगला दाढे असे मृत महिलेचे नाव आहे.
 
नायगव्हाण तालुका फुलंब्री येथील रामेश्वर दाढे पत्नी व मुलीसह शुक्रवार, दि.२४ रोजी दुपारी अन्वी तालुका सिल्लोड येथे दुचाकीवरून (एमएच २० एपी ८५८२) जात होते. सिल्लोड शहर व अन्वी फाट्यापासूनही सारख्या अंतरावर असलेल्या सिल्लोड-अजिंठा रस्त्यावरील मंगरूळ फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने रामेश्वर दाढे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला.
 
कार- दुचाकी अपघातात एक ठार
फुलंब्री- सिल्लोड महामार्गावर नायगव्हाणजवळ दुचाकी आणि  कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाला, तर एकाला गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालायात दाखल करण्यात आले. या अपघातात कारभारी महादू जाधव (२५) हा तरुण जागीच ठार झाला असून शंकर नंदू शिंदे (५०, दोघे रा. बाभूळगाव खुर्द, ता. फुलंब्री) यास गंभीर अवस्थेत  घाटी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोघे जण सिल्लोड येथून आपले काम आटोपून घरी दुचाकीवरून (एमएच २० डीडब्ल्यू ३८०१) परतत असताना हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
गोळेगाव : आपघातात दुचाकीस्वार ठार
गोळेगाव - येथील जुई नदीवर आयशर व दुचाकी अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली.  रमेश किसन काळे (५०) व देवीदास जगन काळे (४०, रा. शिवना) हे दुचाकीवर सिल्लोडकडे जात असताना गोळेगाव येथील जुई नदीवर समोरून येणाऱ्या आयशरने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रमेश किसन काळे हे पंधरा ते वीस फूट खड्ड्यात फेकले गेले व त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी असलेल्या जमावाने रमेश किसन काळे व देविदास जगन काळे यांना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे दाखल केले. अजिंठा पोलिसांनी चालकास अटक केली.
बातम्या आणखी आहेत...