आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनातील आरोपीला मुंबईत केली अटक; पाच महिन्यांपूर्वी पोलिसांना दिला होता गुंगारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी संतोष मोरे पाटील - Divya Marathi
आरोपी संतोष मोरे पाटील
औरंगाबाद- पाच महिन्यांपूर्वी वैजापूर न्यायालयातून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या खुनाच्या आरोपीस ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संतोष महादेव मोरे (२९) असे त्याचे नाव आहे. या आरोपीला पोलिसांनी त्याच्या सातारा येथील घरी नेले होते. आरोपीने पोलिसांना पुढच्या खोलीत बसवले आणि मागच्या खोलीतून पसार झाला होता. 
 
पाच महिन्यांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. तो मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला. गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सूत्रे हलवली. आरोपी ठाण्यातील माळीवाडा भागात असल्याची खात्री पटताच ठाकरे, पोलिस निरीक्षक रणवीर, बयेस, सहायक पोलिस निरीक्षक संदीप बागूल यांनी आरोपीला सिनेवंडर मॉलमध्ये बेड्या ठोकल्या. 
 
कोठडी संपल्यावर 
२०जानेवारी २०१६ रोजी गंगापूर पोलिसांनी १० आरोपींना अटक केली होती. आरोपींना जामीन मिळाला. मोरेची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर २४ जानेवारी २०१७ रोजी त्याला वैजापूर न्यायालयासमोर हजर केले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...