आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्त : आश्रमातून पळण्यासाठी प्रयत्न करायचाे, वर्षापासून थेंबही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपक ठाकरे - Divya Marathi
दीपक ठाकरे
औरंगाबाद - दारूचा थेंब घशात उतरल्याशिवाय माझी सकाळ होत नव्हती. रात्री झोपेपर्यंत दारूच माझ्यासाठी जीवन झाले होते. या व्यसनामुळे पत-प्रतिष्ठा, पैसा आणि कुटुंब गमावून बसलो होतो.  पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात गेलो तेव्हा पळून जाण्यासाठी भिंती पाहत होतो. पण आठ दिवसांचे शिबिर पूर्ण केले अन् आज वर्षभरानंतर मी चार जणांचे जीवन पुन्हा सावरण्यासाठी आलो आहे, अशा शब्दांत दीपक ठाकरे यांनी जीवनकहाणी विशद केली.
 
कांचनवाडी येथील राजश्री शाहू महाविद्यालयात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘प्राण’ शिबिराचा समारोप रविवारी (१४ मे) झाला. या वेळी सहभागींनी मन हेलावून टाकणारे अनुभव सांगितले. दारू, अफूसारख्या जटिल व्यसनांपासून मुक्ती देणाऱ्या या शिबिराने १८ जणांना नवीन आयुष्य दिले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी केलेले अनुभवकथन प्रेरणादायी होते. प्रशिक्षक नितीन प्रधान आणि घनश्याम गोहिल यांनी शिबिरात विविध तंत्र सहभागींकडून करून घेतले. 
 
वाशीमच्या मंगरूळ गावचे दीपक ठाकरे म्हणाले, मी दारूच्या इतका आहारी गेलो होतो की ज्या वेळी मी झोपत असे तितकाच वेळ दारूपासून लांब राहू शकत होतो.  ४० एकर बागायती शेती अन् ट्रॅक्टरची एजन्सी असे सगळे दिमतीला होते. पण या व्यसनामुळे सगळे माझ्यापासून दूर  गेले. बायकोशी वारंवार भांडणे सुरू झाली अन् एक दिवस भांडण इतके विकोपाला गेले की ती मला सोडून निघून गेली. या घटनेने जबर धक्का बसला. वास्तविक पूर्वीही भांडणे व्हायची. तेव्हाच अनेक वेळा दारू सोडावी असे वाटायचे. पण सुटतच नव्हती. पण बायको गेली अन् मग कलाटणी मिळाली. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ‘प्राण’ शिबिरासाठी पुण्यास गेलो.  आश्रमात गेलो तेव्हा कोणत्या भिंतीवरून पळून जाता येईल हे पाहत होतो. पळून जाण्याची सर्व ठिकाणे पाहून ठेवली. पण शिबिर सुरू झाले अन् माझे जीवन बदलले. आज वर्ष उलटले, मी दारूच्या थेंबालाही शिवलो नाही. पुढेही कधीच शिवणार नाही. आजच्या शिबिराला नातेवाईक आणि मित्र असे चौघांना घेऊन आलो आहे. शिबिरात आलो अन् २५ वर्षांची दारू सुटली.
 
पुढील स्लाइडवर वाचा, वाशीमच्या मंगरूळ गावचे दीपक ठाकरे म्हणाले आणि व्यसन शरीराला नव्हे, मनाला आहे : नितीन प्रधान...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...