आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ दारावर, आता आशा कृत्रिम पावसावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सलग चौथ्या वर्षी दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व रायसीमा या भागात मोसमी पावसाने दीड महिन्यापासून दडी मारली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक भयावह स्थिती आहे. मराठवाड्यातील काही तालुक्यात अद्याप ५० मिलीमीटरही पावसाची नोंद नाही. त्यामुळे आता कृत्रिम पावसाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. हा कृत्रिम पाऊस कसा पडतो, त्याचे तंत्र काय या विषयी...
- बाष्पयुक्त ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी केली जाते.
यासाठी सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड, कोरडा बर्फ
(घनरुप कार्बन डायऑक्साइड)यांचा वापर करतात. आपल्याकडे सोडीयम आयोडाईडचा वापर केला जातो.

- यामुळे ढगातील बाष्पाची घनता वाढते. थेंब तयार होतो. त्याचा आकार वाढल्याने थेंब ढगातून खाली पडतो.

- त्यानंतर त्या ढगातील बाष्प पावसाच्या रुपात जमिनीवर पडते.

जुलै १९४६- मध्ये कृत्रिम पावसाचे तत्व व्हिन्सेन्ट शाहाफेर यांनी सर्वप्रथम शोधले. त्यांनीच १४ जुलै १९४६ मध्ये न्यू हॅम्पशायर येथे कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग केला.
कृत्रिम पाऊस पद्धती
कृत्रिम पाऊस पाडण्याच्या
प्रमुख तीन पद्धती आहेत.
१) विमानाने फवारणी करणे
डॉपलर रडारच्या मदतीने बाष्पयुक्त ढगांची माहिती मिळते. त्यानंतर विमान रसायनासह (स्लिव्हर आयोडाइड) त्या ढगांत घुसते. तेथे रसायनांची फवारणी करते. हे रसायन ढगातील बाष्प कणांना चिकटते. त्यांचा आकार वाढतो व पाऊस पडतो. औरंगाबादेत या पध्दतीचा वापर होणार आहे.

२) रॉकेटने ढगांत रसायन सोडणे
यात जमिनीवरून बाष्पयुक्त ढगांवर रसायनयुक्त रॉकेटचा मारा केला जातो. रॉकेटच्या ज्वलनामुळे रसायन ढगांतील बाष्पकणांवर चिकटते व पाऊस पडतो. सध्या नाशिक परिसरात ही पध्दत वापरात येत आहे.

३) जमिनीवर रसायनाचे ज्वलन
या पध्दतीत बाष्पयुक्त ढगांच्या खाली जमिनीवर रसायनाचे ज्वलन केले जाते. रसायनाची वाफ ढगांतील बाष्पाला चिकटते. त्याची घनता वाढते व पाऊस पडतो. ही पध्दत क्वचित वापरतात.

आवश्यक घटक
- ज्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा आहे. तेथील अवकाशात बाष्पयुक्त ढग असावेत.
- असे ढग शोधण्यासाठी रडार यंत्रणा हवी, ढगापर्यंत जाण्यासाठी विमान, रॉकेट हवे.
- त्या परिसरात ७०%आर्द्रता असावी.

महाराष्ट्राची आघाडी
२००३ व ०४ मध्ये दोन वेळा राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी.

महाराष्ट्रात यापूर्वीही कृत्रिम पावसाचे
प्रयोग झाले आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने हायड्रोलॉजी प्रकल्पात एक विभागही स्थापन केला.

२००३- बारामती येथे रडार लावले.
२००४- शेगाव व बारामती येथे रडार उभे.
२०१५- औरंगाबादेत रडारची तयारी.
बातम्या आणखी आहेत...